Vaibhav Naik Raj Thackeray  sarkarnama
पुणे

Vaibhav Naik : 'राज ठाकरेंच्या सभेमुळे विनायक राऊत जिंकणार', वैभव नाईकांनी सांगितलं कारण

Raj Thackeray : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी नारायण राणे प्रथमच निवडणूक लढत आहेत. तर, ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना यंदा हॅटट्रीकची संधी आहे. राणे यांची उमेदवारी उशीरा जाहीर झाली.

Roshan More

Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात कणकणलीमध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे प्रथमच महायुतीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर आले होते. मात्र, राज यांच्या सभेनंतर वैभव नाईक Vaibhav Naik यांनी राज यांना चोख प्रत्युत्तर देताना राज यांच्या सभेमुळे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत विजयी होणार असल्याचा दावा केला.

वैभव नाईक म्हणाले, राज ठाकरे Raj Thackeray जेथे प्रचाराला जातात तेथे त्या उमेदवाराचा पराभव होतो. हा आज पर्यंत इतिहास आहे. राज ठाकरे आले म्हणजे त्या उमेदवाराचा प्रचार करतात तो उमेदवार पडतो म्हणजे पडतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्यामुळे आम्ही रत्नागिरी-सिंधुदुर्गची Ratnagiri-Sindhudurg जागा जिंकू. मागच्या वेळी राज ठाकरेंने लाव रे तो व्हिडिओ म्हणत आमच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र, आमचाच विजय झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी नारायण राणे प्रथमच निवडणूक लढत आहेत. तर, ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना यंदा हॅटट्रीकची संधी आहे. राणे यांची उमेदवारी उशीरा जाहीर झाली. मात्र, त्यांनी प्रचाराला आधीपासूनच सुरुवात केली होती. उद्धव ठाकरेंची सभा शुक्रवारी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर शनिवारी राज ठाकरेंनी कणकवलीत सभेला संबोधित केले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचा मुद्दा मांडत उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. मग ते सत्तेत असताना उद्योगधंदे महाराष्ट्राच्या बाहेर गेले कसे? भाजपने त्यांना मुख्यमंत्री पद दिले असते तर ते आत्ता जे बोलतायेत ते बोलले असते का? सत्तेचा बोळा त्यांनी तोंडात कोंबला असता', असा टोला राज ठाकरे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT