Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र, नारायण राणे Narayan Rane यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी महायुतीकडे आपल्या विरोधात उमेदवार नसल्याचा टोला लगावला होता. विनायक राऊत यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन केले. या मुद्द्यावरून माजी खासदार नीलेश राणे यांनी विनायक राऊत यांना टार्गेट केले.
'विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे शक्तिप्रदर्शन म्हणजे काय बाराशे लोक. एक काळ होता शिवसेनेचा ज्यावेळेला मैदान भरत होते, पण आता अंगणसुद्धा भरत नाही .विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरताना अर्ध्या गाड्या या मुंबईतून आणल्या गेल्या होत्या. बाराशे लोकांना घेऊन त्यांनी फॉर्म भरायचा कार्यक्रम आटोपला,' असा टोला नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगावला.
नारायण राणे यांचा मतदारसंघात महिनाभर झंझावात सुरू आहे. राणे यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती गावागावांत आहे, असा दावा नीलेश राणे यांनी केला. नारायण राणेंवर टीका करणाऱ्या वैभव नाईक यांनादेखील नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. वैभव नाईक यांच्यासारख्या रिकामटेकडा आमदार महाराष्ट्रात नाही. ते काय बोलतात याची आम्ही काडीचीही किंमत देत नाही. त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे टाइम वेस्ट करणं आहे, असे नीलेश राणे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी शिंदे गटाचा या जागेवर दावा कायम आहे. शिंदे गटातील किरण सामंत यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतले आहेत. महायुती ज्या उमेदवाराची घोषणा करेल त्याचा आम्ही प्रचार करू, असे किरण सामंत सांगत आहेत. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वासदेखील ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे उमेदवाराची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.