Loksabah Election : बारामतीमध्ये आज (रविवारी) सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेत सुप्रिया सुळेंना अजित पवारांचे थेट नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. ते सांगतात माझी अमित शहा, नरेंद्र मोदी Narendra Modhi यांच्याशी ओळख आहे. ओळख आहे तर करा ना त्यांना फोन करा कांद्याचा प्रश्न सोडवा. तुम्ही ज्यांना घाबरता त्यांच्या समोर आम्ही दिल्लीत भाषण करतो, असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांन लगावला.
सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणाल्या, माझे काय चुकले? मोठ्यांचा आदर करायचे आणि लहानांना प्रेम द्यायचे हे संस्कार आपल्यावर केले आहे. दादा म्हणून मान दिला. खासदार असलेतरी कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप केला नाही. हव तर राहुल कुल, संग्राम थोपटे यांना विचारा.आज माझ्यावर टीका होते. मात्र, कशात ढवळा ढवळ केली होती. कधीही साध्या पीआयच्या बदलीसाठी फोन केला. आमच्यावर केलेले संस्कार, आमचा चांगुलपणा नडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसला NCP नॅचरल करप्ट पार्टी म्हणणारे आज मुलीमुळे पक्ष फुटला असे म्हणत आहेत.ते राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणत नाहीत, म्हणून त्यांचे आभार मानते, असा टोला सुळेंना भाजप नेत्यांना लगावाल. आम्ही विकास करतो तो काही आमच्या खिश्यातील पैशाने करत नाही. नागरिक टॅक्स देतात म्हणून तो विकास होतो. विकासाचे श्रेया एका कोणाचे नाही, असे देखील सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे सात तारखेनंतर बारामतीत दिसणार नाहीत, अशी टीका करण्यात येत होती. या टीकेला सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. माझं बारामतीत घर आहे. मात्र मी बारामती येते की नाही हे विचारणारे 18 वर्ष पालकमंत्री होते. ते कितीवेळा दुसऱ्या तालुक्यात गेले. देवेंद्र फडणवीसांबरोबर हॅलिकाॅप्टरने यायचे आणि हॅलिकाॅप्टरने जायचे. जमीनवर काय चाललंय माहितच नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.