vivek Fansalakar, nitin karir  Sarkarnama
पुणे

Vivek Phansalkar: अन्यथा, १९८८ च्याच बॅचचे मुख्य सचिव आणि डीजीपीही राज्याला मिळाले असते, प्रभारी डीजीपींची झाली हॅटट्रिक

Police Commissioner : पुणे सीपी राहिलेल्या शुक्ला दिल्लीहून न आल्याने त्यांना एक वर्षे ज्युनिअर पुणेकर फणसळकर झाले हंगामी डीजीपी

Uttam Kute

Pune News: राज्याचे हंगामी पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून मुंबईचे पोलिस आयुक्त (सीपी) विवेक फणसळकर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा हंगामीच डीजीपी मिळाले. तसेच मुंबईचे सीपी हे राज्याचे डीजीपी होण्याची प्रथा कायम राहिली. मुंबईचे सीपी आणि राज्याचे डीजीपी अशी दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आली.

रिटायर झालेले डीजीपी रजनीश शेठ हे यापूर्वी २०२१ मध्ये १८ मार्च ते १० एप्रिलपर्यंत प्रभारी तथा हंगामी डीजीपी होते. त्यानंतर संजय पांडे हे १० एप्रिल २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राज्याचे प्रभारीच पोलिस प्रमुख होते. त्यानंतर पुन्हा शेठ हे गेल्यावर्षी १८ फेब्रुवारीला डीजीपी झाले ते आजपर्यंत होते. त्यांच्यानंतर फणसळकरांनाही कायम डीजीपी पदावर नेमण्यात आलेले नाही. अशारितीने हंगामी डीजीपींची हॅटट्रिक झाली आहे. त्यातून कायम डीजीपी म्हणून दुसरी व्यक्तीही तिथे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, १९८८ च्याच आयएएस बॅचचे नितीन करीर (Nitin karir) यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. तर,दुसरीकडे आजच डीजीपी म्हणून नेमणूक झालेले फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. १९८८ च्या आयपीएस बॅचच्या पुण्याच्या माजी सीपी रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांचे नाव डीजीपी म्हणून चर्चेत होते. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. पुन्हा महाराष्ट्रात त्या न आल्याने पुणेकर फणसळकर हंगामी डीजीपी झाले.

डीजीपीपेक्षा मुंबईचे सीपी म्हणून येण्यास शुक्ला जास्त उत्सुक असल्याचे समजते. जर, त्यांची डीजीपी म्हणून नियुक्ती झाली असती,तर राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी १९८८ च्या एकाच बॅचचे अधिकारी झाले असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य पोलिस दलात मोठा खांदेपालट

मुंबई सीपी आणि राज्याचे डीजीपी ही दोन्ही पदे एकाच लेवलची आहेत. दरम्यान, फणसळकर हे प्रभारी डीजीपी असल्याने शुक्ला या डीजीपी वा मुंबई सीपीपदी येण्य़ाचा दरवाजा उघ़डा ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई सीपी वा राज्याच्या डीजीपी म्हणून त्या विधानसभा वा महापालिका निवडणुकीच्या वेळी येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य पोलिस दलात मोठा खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडलाही नवे सीपी मिळू शकतात. दरम्यान, शुक्ला या दिल्लीहून आल्या नाहीत, तर फणसळकर यांना डीजीपी केले जाऊ शकते, अशा आशयाची बातमी दोन दिवसांपूर्वीच (ता.२९) सरकारनामाने दिली होती.ती खरी ठरली आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT