Sunil Shelke, Bala Bhegde
Sunil Shelke, Bala Bhegde Sarkarnama
पुणे

Bazar Samiti Election : मावळ बाजार समितीवर आम्हीच विजयी होणार; शेळके-भेगडेंचा दावा

Sunil Balasaheb Dhumal

Maval APMC Election : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शुक्रवारी (ता. २९) शांततेत ९८.२७ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. २९) होणार असून ही बाजार समिती कुणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

मावळ बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल व भाजपप्रणित छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये थेट लढत झाली. दोन्ही पॅनेलच्या वतीने येथे बूथ उभारण्यात आले होते. या बुथवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी ठाण मांडून बसले होते.

बड्या नेत्यांनी लक्ष घातल्याने या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. आता या निवडणुकीवर आमचाच विजय होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde) यांनी केला आहे.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (MAval APMC) १८ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. बाजार समितीचे एकूण एक हजार ६१८ मतदार आहेत. मतदानासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी चारपर्यंत एक हजार ६१८ मतदारांपैकी एक हजार ५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मावळ बाजार समितीच्या कृषी पतसंस्था मतदारसंघासाठी ६४८ पैकी ६४३, ग्रामपंचायतच्या जागांसाठी ८५२ पैकी ८३६, व्यापारी व आडते मतदारसंघात १०८ पैकी १०१ तर हमाल व तोलारी मतदारसंघात १० पैकी १० असे मतदान झाले. या निवडणुकीतील चुरस लक्षात घेऊन येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आता मतमोजणी शनिवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता वडगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या निवडणुकीत परिवर्तन होऊन सर्वपक्षीय छत्रपती शिवाजी महाराज पॅनेल निश्चित विजयी होईल, असा दावा केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT