Khed Bazar samiti Result : खेड बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम : मोहितेंसह १० जण विजयी; विरोधकांना ६ जागा

पॅनेलविरहित निवडणूक लढविलेल्या व्यापारी व आडते मतदारसंघातून माणिक गोरे व महेंद्र गोरे हे विजयी झाले.
Khed Bazar samiti
Khed Bazar samitiSarkarnama

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड (Khed) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bazar Samiti) राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत (NCP) भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनेलचा विजय झाला असून या पॅनेलने १६ पैकी १० जागा जिंकून बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे. सर्वपक्षीय भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलला ६ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये व्यापारी विजयी उमेदवारांचा समावेश नाही. (NCP continued to dominate the Khed Bazar Samiti)

बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेल आणि सर्वपक्षीय भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेल हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते.

Khed Bazar samiti
Bhor Bazar Samiti Result : संग्राम थोपटेंनी राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांना ताकद दाखवली : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

भीमाशंकर सहकार पॅनेलने कृषी पतसंस्था मतदारसंघातून ७, ग्रामपंचायत मतदारसंघातून २, हमाल तोलारी मतदारसंघातून १ जागा जिंकून बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. या पॅनेलमधून कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघातून आमदार दिलीप मोहिते, कैलास लिंभोरे, विनोद टोपे, जयसिंग भोगाडे हे विजयी झाले. इतर मागास प्रवर्गातून हनुमंत कड विजयी झाले आहेत.

Khed Bazar samiti
Bazar Samiti Election : शिवतारे-जगतापांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नीरेत ९५ टक्के मतदान : युतीच्या प्रचारातंत्राने महाआघाडी सावध

महिला राखीव गटातून कमल कड या विजयी झाल्या. कृषी पतसंस्था अनुसूचित जमाती गटातून विठ्ठल वनघरे हे निवडून आले. हमाल व तोलारी मतदारसंघातून सयाजी मोहिते हे विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून रणजित गाडे हे विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल गटातून अशोक राक्षे हे निवडून आले.

Khed Bazar samiti
Bazar Samiti Result : मंगळवेढ्यात आवताडेच 'बॉस' : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर वर्चस्व; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना फक्त दोन मते

सर्वपक्षीय पॅनेलने कृषी पतसंस्था मतदारसंघातून ४, ग्रामपंचायत मतदारसंघातून २ जागा जिंकल्या. या पॅनेलमधून कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघातून विजयसिंह शिंदे, अनुराग जैद, सोमनाथ मुंगसे हे विजयी झाले. महिला राखीव गटातून क्रांती सोमवंशी या विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून सागर मुऱ्हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सुधीर भोमाळे हे विजयी झाले आहेत. पॅनेलविरहित निवडणूक लढविलेल्या व्यापारी व आडते मतदारसंघातून माणिक गोरे व महेंद्र गोरे हे विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com