Supreme Court of India
Supreme Court of India Sarkarnama
पुणे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा नेमका अर्थ काय ?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) निकालाचे तज्ञांकडून वेगवेगळे अर्थ लावण्यात येत आहेत. या निकालानुसार सर्व परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी लागणार असल्याचे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. १२ जुलैपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवायची याचा अर्थ तोपर्यंत सरकारवर अविश्‍वास ठराव आणता येणार नाही, असा या निकालाचा अर्थ असल्याचे बापट (Ulhas Bapat) यांचे मत आहे.दुसरीकडे न्यायालयाने अविश्‍वास ठरावाबाबत कोणतेही भाष्य केले नसल्याचे तज्ञ सांगत आहेत.

बापट म्हणाले, ‘‘ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या सध्या प्रक्रियेस न्यायालयाच्या आजच्या निकालाने १२ जुलैपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आजची सुनावणी सुटीकालीन न्यायालयापुढे झाल्याने पुढील सुनावणी ११ जुलैला ठेवण्यात आली आहे. या काळात मुख्यमंत्री म्हणून ऊद्धव ठाकरे असतील. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्णपणे काम करता येईल. या काळात अधिवेशन बोलविता येणार नाही तसेच राज्य सरकारवर अविश्‍वास ठराव आणता येणार नाही.’’

या निकालामुळे बंडखोर आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी तब्बल १४ दिवसांचा अवधी मिळणार आहे. या काळात अधिवेशन घेता येणार नाही. त्यामुळे सरकार अल्पमतात आहे हे सिद्ध होणे शक्य नाही.त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच येणार नाही, असे बापट यांनी म्हटले आहे.

बापट यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार येत्या ११ जुलैच्या आधी राज्य सरकारवर अविश्‍वास ठराव मांडता येणार नाही. ११ जुलैपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी लागणार आहे. बापट यांनी ही भूमिका मांडली असली तरी न्यायालयाने केवळ बंडखोर आमदारांवर कारवाईला मनाई केली असून अविश्‍वास ठरावाबाबत कोणतेही भाष्य केले नसल्याचे तज्ञ सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT