'प्रसाद घाबरू नकोस शिवसेना तूझ्या पाठीशी आहे'; आदित्य ठाकरेंनी सावंताना दिला धीर

Aditya Thackeray : माथेरान येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Aditya Thackeray, Prasad Sawant Latest News
Aditya Thackeray, Prasad Sawant Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray: माथेरान येथील शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक प्रसाद सावंत (Prasad Sawant) यांच्या तब्येतीची विचारपूस शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वत; कळंबोली येथील एम.जी.एम रुग्णालयात जाऊन केली आहे. 'प्रसाद घाबरू नकोस शिवसेना तूझ्या पाठीशी आहे', अश्या शब्दात त्यांनी प्रसाद सावंत यांना धीर दिला. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावत हल्ल्याप्रकरणाची माहिती घेतली.

Aditya Thackeray, Prasad Sawant Latest News
बंडखोरांना पाडण्यासाठी अदित्य ठाकरेंचा प्लॅन तयार

सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिवसैनिक संभ्रमात आहेत. यामुळे शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि शिवसेना, असे दोन गट पडले असून त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. असाच प्रकार माथेरान येथे घडला आहे. शिवसेनेच्या व्हाट्स ऍप ग्रुपमधील चॅटिंगच्या वादाचे पर्यावसन दोन गटामध्ये हाणामारीत झाले आहे. याबाबत माथेरान पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Aditya Thackeray, Prasad Sawant Latest News
तुमच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी मातोश्रीचे उंबरे झिजवले, याची जाणीव ठेवा....

पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांना कर्जत कोर्टात हजर केले होते. कोर्टातून बाहेर आल्यानंतर प्रसाद सावंत माथेरानकडे परतत असताना कर्जत येथील रॉयल गार्डन जवळ 15 ते 20 अज्ञातांनी सावंतांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या गाडीच्या नुकसानी बरोबरच सावंत ही जखमी झाले आहेत. त्यानंतर तत्काळ त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व तेथून पुढील उपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

यानंतर मावळ लोकसभाचे खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रमुख बबन पाटील यांनी रूग्णालयात जाऊन सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आता आज (ता.27 जून) अदित्य ठाकरे यांनीही रूग्णालयात जाऊन सावंतांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सावंत यांना अदित्य यांनी 'प्रसाद घाबरू नकोस शिवसेना तूझ्या पाठीशी आहे, अश्या शब्दात त्यांना धीर दिला आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडून हल्ल्याप्रकरणी काय गुन्हा दाखल केला आणि किती जणांना अटक झाली यासंदर्भातील माहिती घेतली

Aditya Thackeray, Prasad Sawant Latest News
त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही... अरूणाताई बर्गे

दरम्यान, शुक्रवारी (ता. 24 जून) रात्री शिवसेनेच्या एका व्हाट्स ऍप ग्रुपवर बंडखोर कोण आणि खरे कोण यावर चॅटिंग सुरू होती. त्यामध्ये शिंदे समर्थकांचा गट आणि शिवसैनिक यांच्यात चॅटिंग मधून शाब्दिक चकमक सुरू झाली. दरम्यान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटो हटविण्यावरून वाद सुरू झाला.

यानंतर थोरवे समर्थक शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा एक गट तर माथेरान शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांचा एक गट यांच्या गटात गद्दारीवरून हमरीतुमरी सुरू झाली. रात्री 10:30 च्या सुमारास शिवसेना माजी नगरसेवक नरेश काळे यांच्या घरात जाऊन शहराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी तोडफोड केली. ही माहिती माजी नगरसेवक नरेश काळे यांनी सावंत याना सांगितली. यानंतर सावंतांनी काळेंचे घर गाठून माहिती घेऊन ते पोलीस ठाण्यात जात असताना मध्य रात्रीच्या वेळी चौधरी व त्यांचे सहकारी आणि सावंतांचे सहकारी रस्त्यामध्येच एकमेकांसमोर आले आणि शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोन्ही बाजूचे लोक किरकोळ जखमी झाले. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखस झाले. आणि दोन्ही गटांना ताब्यात घेऊन दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com