Pune Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकत मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाला नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गटांत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी दोनच शब्दांत विषय संपवत या चर्चेला काही अर्थ नसल्याचेच सूचित केले आहे. (Latest Political News)
संसदेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर सुळे पुण्यात परतल्या आहेत. त्यावेळी त्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. या वेळी सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते सिद्ध करा नाहीतर माफी मागा, असे आव्हान सुळेंनी पुन्हा भाजपला केले. तसेच 'आम्ही कुणाचे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर विकास, जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे,' असे सुळेंनी ठणकावून सांगितले. (Maharashtra Political News )
राष्ट्रवादी फुटल्यानंतर न्यायालयात लढा सुरू आहे. चिन्ह आणि नाव कुणाकडे राहील, यावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. यावर सुळे दोन शब्द बोलल्या ते म्हणजे, 'सत्यमेव जयते!' यानंतर त्या म्हणाल्या, 'या देशातील सर्वांना माहीत आहे की, राष्ट्रवादी कुणी स्थापन केली आणि राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण आहे ते,' असे म्हणत राष्ट्रवादी ही शरद पवारांची (Sharad Pawar) असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही तेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'ही लढाई आम्ही सुरू केलेली नाही. आमच्या मनातही ही लढाई करण्याची इच्छा नव्हती. आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी, पॉलिसी मेकिंगचे राजकारण करतो. त्यामुळे वकिलांकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला कुणाचा हक्क हिरावून घ्यायचा नाही. आता आमच्यावर हल्ला झाल्याने दुसरा पर्याय नाही. आम्ही कुणाला नोटीस पाठवली नाही. आम्हालाच निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्ष आणि चिन्ह त्यांनाच मिळणार आहे, असा दावा केला. त्यामुळे सध्या काय चालले आहे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे,' असेही सुळे यांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.