Deenanath Mangeshkar Hospital Sarkarnama
पुणे

Deenanath Mangeshkar Hospital controversy : तब्बल 25 संघटनांची आंदोलन, एवढा रोष का? नेमकं हॉस्पिटल प्रशासनाचं चुकतंय कुठं?

Political organizations Pune growing anger Deenanath Mangeshkar Hospital : पुणे इथल्या दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल प्रशासनाविरोधात राजकीय संघटनांचा रोष का वाढलेला दिसतो.

Sudesh Mitkar

Pune News : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीचा पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार न मिळाल्याने किंवा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला, असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे.

ही घटना समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याची पाहिला मिळाली.

एखादी घटना घडल्यानंतर राजकीय (Political) पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हा दुर्दैवी प्रकार समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष हे रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांचा निगडित संघटनांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमकपणे आंदोलन केली.

राजकीय पक्षांमध्ये रुग्णालय प्रशासनाविषयी खदखद!

सर्व संघटनांच्या आणि राजकीय पक्षांचा रोष या घटनेमुळे समोर आलेला असला तरी ही खदखद मागील अनेक घटनांमधून निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. एखादा गरजवंत रुग्ण राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मदत मागायला गेल्यानंतर या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रुग्णालय (Hospital) प्रशासनाला संबंधित रुग्णाला मदत करण्याबाबत अथवा बिल कमी करण्याबाबत संपर्क साधला येतो. मात्र अनेक वेळा रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली नसल्याने राजकीय वर्तुळात रुग्णालय प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात खदखद होती का गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

माफक दरात उपचार मिळण्याची अपेक्षा फोल

दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालय असल्याने या ठिकाणी गरीब आणि सामान्य कुटुंबातील नागरिकांना अत्यंत माफक दरात उपचार मिळणे आवश्यक असल्याचं बहुतांश लोकांचं मत आहे. मात्र या रुग्णालय प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रक्कम घेण्यात येत असल्याबाबत सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या सोबत घडलेल्या प्रसंगाच दाखला देत सोशल मीडियावर या रुग्णालय विरोधात व्यक्त होत आहे. आणि आपल्याबरोबर घडलेल्या प्रसंगाबाबत खदखद व्यक्त करत आहे.

सरकारकडून नाममात्र दरात जागा

2001 मध्ये सरकारने दिनानाथ रुग्णालयाला नाममात्र दरामध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 18 फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साडेसातशे चौरस फूट जागा अवघ्या एक रुपया वार्षिक भाडेतत्त्वावरती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन रुग्णालयाला एवढा उदारपणे मदत करत असेल तर रुग्णालयाने देखील उदारता दाखवायला हवी अशी नागरिकांची भूमिका आहे. मात्र या घटनेने रुग्णालय प्रशासन कडून काही उलटत होत असल्याचं भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याने रुग्णालय प्रशासना विरोधात रोष असल्याचे बोललं जात आहे.

योजनेतून उपचार देण्यास नकार

राज्य सरकारने गोरगरिबांना उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील उपचार देण्यासाठी या रुग्णालयाकडून नाकार देण्यात आलं असल्याची बाबा काही संघटनांनी समोर आणली आहे.

पालिकेचा 27 कोटींचा कर थकवला

तसेच एकीकडे रुग्णालय प्रशासन रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारत असताना दुसरीकडे रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकत कर थकवला असल्याचं देखील समोर आला आहे. त्यामुळे या सर्व समोर येणाऱ्या घडामोडी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि तोच रोज या आंदोलनाच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळत आहे.

संघटनांनी आंदोलन केली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे, युवक काँग्रेस, पतीत पावन संघटना, गुलाबो गॅंग, वंचित बहुजन आघाडी,आंबेडकरी कार्यकर्ते, आम आदमी पक्ष, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, अखंड मराठा समाज, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, युवा सेना शिंदे गट, रुग्ण हक्क परिषद, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान, दलित महासंघ यासह छोट्या-मोठ्या अन्य संघटनांनी रुग्णालय प्रशासना विरोधात आंदोलन केल्याच्या समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT