Deenanath Hospital Controversy : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सत्य आजच येणार समोर, चौकशी समितीचा अहवाल तयार!

Deenanath Hospital Government Inquiry Committee : तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये पाच सदस्यांचा समावेश होता.
Deenanath Hospital
Deenanath Hospitalsarkarnama
Published on
Updated on

Tanisha Bhise Death : आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र, 10 लाख 10 लाख डिपॉझिटची मागणी करत उपचार नाकारल्याने गर्भवती तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. खुद्द आमदार आमदार अमित गोरखे यांनीच हा आरोप केला आहे. त्यामुळे दीनानाथ रुग्णालयावर कारवाईची मागणी होत आहे.

तनिषा यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. नागनाथ यम्पल्ले,डॉ. निना बोराडे , डॉ. कल्पना कांबळे यांचा समावेश आहे. या समितीने शुक्रवारी (ता.4) रुग्णालयाला भेट देत या प्रकरणाचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सरकारला पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Deenanath Hospital
Dinanath Hospital : गर्भवतीचा जीव गेल्यानंतर दीनानाथ रुग्णालयाचे प्रशासन 'ताळ्यावर'; इमर्जन्सी पेशंटसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय

समितीने आपला अहवाल सरकार दिला असल्याने या अहवालामध्ये नेमके काय आहे? हे आजच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नेमकी चूक कोणाची हे देखील कळणार आहे. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने देखील आपली समिती स्थापन करून या घटनेचा तपास केला होता. यामध्ये रुग्णालयाची चूक नसून डिपॉझिट मागितल्याच्या रागातून तक्रार करण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही मानले नाहीत, असाही निष्कर्ष समितीने काढला आहे.

रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही

मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाच्या विश्वस्तांची बैठक झाली. हा बैठकीमध्ये यापुढे कुठल्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शरद पवारांनी घेतली माहिती

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगितले जात आहे. तर, गर्भवतीच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक, राजकीय संघटनांकडून करत रुग्णालयासमोर आंदोलन केले जात आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची माहिती शरद घेतली. ते या संदर्भात प्रशासनाशी चर्चा करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Deenanath Hospital
Vijay Wadettiwar On Manikrao Kokate : माणिकरावांचा शेतकऱ्यांना उलट सवाल, वडेट्टीवार म्हणाले त्यांना मस्ती आली आहे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com