मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  सरकारनामा
पुणे

पालखी महामार्गाच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे येणार का?

आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आळंदी-पंढरपूर तसेच देहू-पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी पंढरपूर येथे होणार आहे.या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारतीय जनता पार्टीचे राज्यातील व जिल्ह्यातील नेत्यांची नावे आहेत. मात्र,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार की नाही याबाबत साशंकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने भूमीपूजन करणार आहेत. कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती दर्शविण्यात आली आहे. भूमीपूजनाचा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यातील भाजपाचे आमदार, खासदार व इतर पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार की नाही. त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे की नाही या बाबत नेमकी माहिती मिळत नाही.

देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. पंढरपूरजवळ वाखरीपासून नातेपुतेपर्यंत गेल्या सहा महिन्यांपासून काम प्रगतीपथावर आहे. मात्र, कामाचे औनचारिक भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी याआधी जाहीर केल्याप्रमाणे हा महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प असून या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

रस्त्याची बांधणी करताना पंढरपूरला पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घेण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावर आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.राज्यातील अत्यंत महत्वाचा मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहण्यात येत असून गडकरी स्वत: या कामात लक्ष घालत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT