Yashwant Sahakari Sakhar Karkhana sarkarnama
पुणे

Pune News : यशवंत कारखाना निवडणुकीत मात्तबरांची प्रतिष्ठा पणाला, 'या' दोन पॅनेलमध्ये कांटे की टक्कर

Yashwant Sahakari Sakhar Karkhana Election : 21 जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी कारखान्यासह इतर सहकारी संस्थेतील आजी, माजी पदाधिकाऱ्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

कृष्णकांत कोबल

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि पुणे बाजारसमितीच्या निवडणुकीनंतर आता थेऊर (ता. हवेली) येथील बारा वर्षांपासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची ( Yashwant Sahakari Sakhar Karkhana ) पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. स्व. अण्णासाहेब मगर, मणिभाई देसाई, शिवाजीराव घुले या धुरिणांनी आपल्या योगदानातून यशवंत सहकार साखर कारखान्याला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. पण, आर्थिक अनियमिता असल्यामुळे एक तपापूर्वी बंद झालेल्या या कारखान्याचे संचालक होण्यासाठी आजच्या या निवडणुकीतही मोठी चुरस निर्माण झाली आहे.

संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी कारखान्यासह इतर सहकारी संस्थेतील आजी, माजी पदाधिकाऱ्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( Yashwant Sahakari Sakhar Karkhana Election ) माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल तर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे.    

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्थिक अनियमितेमुळे मागील बारा वर्षांपासून बंद असलेला कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात पॅनल प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, महादेव कांचन, प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर हे सहकारातील प्रमुख नेते, तर कारखान्याचे उमेदवार म्हणून कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे, राजीव घुले, आप्पासाहेब काळभोर, कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे पुत्र सागर काळभोर, माजी संचालक महादेव कांचन यांचे पुत्र अजिंक्य कांचन, माजी संचालक सुभाष जगताप, संतोष कांचन, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, मांजरी बुद्रुकचे माजी उपसरपंच राहुल घुले, मांजरी खुर्दचे माजी उपसरपंच किशोर उंद्रे, फुरसुंगीचे अमोल हरपळे, दौंड पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे असे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

त्यामुळे यशवंत सहकारी कारखान्याच्या निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे पूर्व हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

असे आहेत प्रमूख प्रतिस्पर्धी उमेदवार

गट क्र. १ :

अजिंक्य महादेव कांचन, अमित भाऊसाहेब कांचन, विकास विलास आतकीरे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

सुशांत सुनिल दरेकर, संतोष आबासाहेब कांचन व सुनिल सुभाष कांचन (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

गट क्र. २ :

राजेंद्र रतन चौधरी, मारुती सिताराम चौधरी, लोकेश विलास कानकाटे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी व  ताराचंद साहेबराव कोलते (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी) 

गट क्र. ३ :

आप्पासाहेब रंगनाथ काळभोर, राहुल मधुकर काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

अमर उद्धवराव काळभोर, योगेश प्रल्हाद काळभोर व मोरेश्वर पांडुरंग काळे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी) 

गट क्र. ४ :

राजीव शिवाजीराव घुले, सुरेश फकीरराव कामठे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

अमोल प्रल्हाद हरपळे व राहुल सुभाष घुले (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी) 

गट क्रं. ५ :

रोहिदास दामोदर उंद्रे, आनंदा देवराम पवार (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

किशोर शंकर उंद्रे व रामदास सिताराम गायकवाड (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

गट क्र. ६ :

शामराव सोपाना कोतवाल, दीपक कुशाबा गावडे (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

सुभाष चंद्रकांत जगताप व रमेश जगन्नाथ गोते  (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी :

सागर अशोक काळभोर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

संजय सोपानराव गायकवाड  (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

अनुसूचित जाती - जमाती :

संतोष दत्तात्रय वेताळ (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

दिलीप नाना शिंदे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

महिला राखीव प्रतिनिधी :

सुरेखा मधुकर घुले, संगीता सखाराम काळभोर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

हेमा ​​मिलींद काळभोर व रत्नाबाई माणिक काळभोर (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी) 

इतर मागास वर्गीय प्रतिनिधी :

रोहिदास गोविंद टिळेकर (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल) 

मोहन खंडेराव म्हेत्रे (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी :

मारुती किसन थोरात (अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल)

कुंडलिक अर्जून थोरात (अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT