Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

Eknath Shinde: "मोदी काल बोलले अन् आज खात्मा झाला..."; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde: ऑपरेशन सिंदूरबाबत आज लोकसभेत चर्चा सुरु असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी घडामोड घडली.

Sudesh Mitkar

Pune News : पहलगाम इथं पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत चर्चा सुरू असताना जम्मू-काश्मीरमध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. यापार्श्वभूमीवर पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौरावर होते, यावेळी त्यांनी दिवंगत दीपक टिळक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी साधला. शिंदे म्हणाले, पहलगाममध्ये लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप दहशतवाद्यांनी केलं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं.

भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करून टाकलं त्याबाबत यापूर्वीच आम्ही अभिनंदन केलं आहे. त्यानंतर सर्व देशवासीयांची इच्छा होती की, ज्या आतंकवाद्यांनी लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं त्यांना देखील यमसदनी पाठवलं पाहिजे असं सर्वांनाच वाटत होतं. आज त्या आतंकवादांना मारण्यात यश आलं असल्याच्या बातम्या येत आहेत. निश्चितच भारतीय सैन्यदलाची ही कामगिरी अभिमानास्पद आहे.

रविवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा शत्रू जगाच्या कुठलाही कानाकोपऱ्यात जिवंत राहू शकणार नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तमाम भारतवासीयांच्या मनामध्ये खदखद होती की, हे दहशतवादी मारले गेले पाहिजेत आणि ती कामगिरी भारतीय सैन्य दलानं करून दाखवलेली आहे. त्यामुळं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन महादेव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, सोमवारी भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन महादेव राबवलं, दारामधील लिडवास भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीव्र चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. यासंदर्भात सैन्याच्या चिनार कॉर्पने ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT