Senior NCP leaders from Pune district join the BJP in the presence of party leaders, signaling a major political shift ahead of Zilla Parishad elections. Sarkarnama
पुणे

Pune ZP Election: पुणे,पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता भाजपचा जिल्हा परिषदेतही डाव; अजितदादांना धक्क्यावर धक्का

Pune Zilla Parishad Election: महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने आक्रमक डाव आखत राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो, Sudesh Mitkar

Pune district rural politics BJP vs NCP: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक मोठ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यातील बहुतांश नेते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील होते. या नेत्यांना पक्षात घेऊन भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि यातील बहुतांश नेते विजयीही ठरले होते.

त्याच धर्तीवर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही भाजपने ‘दादांच्या’ खंदे समर्थकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा प्लॅन आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे आणि शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दिलीप वळसे-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भगदाड

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने ते नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांचा मोठा गट सोबत घेऊन कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे वळसे-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले आहे.

भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश घडवून आणण्यात आले. ,यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आमदार राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे आणि धर्मेंद्र खांडरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपकडून अशा आणखी प्रवेशांची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT