Pune Politic's : अजितदादांनी ‘ZP’च्या राजकारणातील हुकमी एक्का लावला गळाला; एका तपानंतर राष्ट्रवादीत स्वगृही परतणार

Zilla Parishad Election 2026 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सभापती शरद बुट्टे पाटील १२ वर्षांनंतर राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. या प्रवेशामुळे अजित पवारांचा जिल्हा परिषद बालेकिल्ला अधिक मजबूत झाला आहे.
Ajit Pawar-Sharad Butte Patil
Ajit Pawar-Sharad Butte PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 19 January : जिल्हा परिषदेच्या राजकारणातील हुकमी एक्का उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गळाला लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालमीत तयार होऊन मागील निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील हे आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत तब्बल 12 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाच्या माध्यमातून अजितदादांनी आपला बालेकिल्ला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सपाटून मार खालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ‘झेडपी’च्या तोंडावर खेड तालुक्यात मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत बुट्टे पाटील यांनी पक्ष सोडल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजपचे उत्तर पुणे जिल्ह्याध्यक्षपदाची जबाबदारी शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांच्याकडे होती. तसेच, जिल्हा परिषदेतील सभागृह नेतेपदही बुट्टे यांच्याकडे होते. शरद बुट्टे पाटील हे आज (ता. १९ जानेवारी) तब्बल १२ वर्षांनंतर स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बुट्टे पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे.

शरद बुट्टे पाटील यांनी तीन वेळा खेड तालुक्यातील भामा खोऱ्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. तब्बल १५ वर्षे ते जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत, तर एकदा गट राखीव झाल्याने त्यांंनी समर्थक महिलेला बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करून जिल्ह्यात इतिहास घडविला होता. त्यातून त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून येते.

Ajit Pawar-Sharad Butte Patil
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराचा 'लेटरबॅाम्ब'; कुर्सी नहीं, कीमत बचाने चला हूँ...पक्ष नेतृत्वावर नाराज

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर म्हणजेच १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती करण्यात आले होते. काम करूनही विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्याने त्यांनी २०१४ च्या दरम्यान राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Ajit Pawar-Sharad Butte Patil
Mayor Reservation : महापौर आरक्षण सोडत 22 जानेवारीला; शिंदेकडील खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपूर्ण प्रक्रिया

भाजपनेही त्यांना उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसेच, पुणे जिल्हा परिषदेत सभागृह नेतेपदीही बुट्टे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले होते. आता ते पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बुट्टे पाटील यांच्या वराळे या गावी कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांच्या उपस्थितीत ते आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी त्यांच्या समवेत विविध गावचे सरपंच आणि अन्य पदाधिकारीही प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com