Governor Ramesh Bais Sarkarnama
राज्य

Bhandara News : राज्यपालांच्या भंडारा दौऱ्यावर 'अवकाळी'चे सावट...

Ramesh Bais : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून साधणार ग्रामीण नागरिकांशी संवाद.

अभिजीत घोरमारे

Bhandara News : विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा 8 डिसेंबरला भंडारा जिल्हा दौरा ठरला आहे. राज्यपालांच्या दौऱ्यासाठी आणि त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. दिवाळी होताच जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा झाला होता.

त्या कार्यक्रमासाठी महिनाभरापासून प्रशासन कामाला लागले होते. त्यानंतर आता राज्यपालांचा नियोजित कार्यक्रम आल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमासाठी दुर्गम किंवा शहरापासून दूर असणारे गाव निवडण्याच्या सूचना प्रशासनाला आहेत. त्यादृष्टीने गावाचा शोध घेतला जात आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्याने स्थळ ठरविताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे.

राज्यपाल रमेश बैस Ramesh Bais हा दौरा नागपुरातून रस्ता मार्गाने होणार आहे. अद्याप हवाई दौऱ्याबाबत कोणतीही सूचना नाही. हवामानाची स्थिती पाहता राज्यपाल हवाई मार्गाने येण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबतच पोलिस विभागही या दौऱ्याच्या तयारीसाठी कामाला लागला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकीतून नियोजन केले जात आहे.

नागपूर ते भंडारा Bhandara या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पोलिसांना भर पावसात रस्त्यांवर थांबावे लागणार आहे. भंडारा शहरालगत शहापूर या गावाचा विचार या कार्यक्रमासाठी केला जात आहे. राज्यपाल गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आंदोलन, गोसेखुर्द प्रकल्‍पग्रस्‍तांचे प्रश्न यामुळे प्रशासन सतर्क आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर रुग्णवाहिका चालक, वन विभागातील कर्मचारीदेखील वेतन आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. याशिवाय पावसाचे सावट असल्याने राज्यपालांच्या नियोजित कार्यक्रम इंनडोअर हॉलमध्ये घेण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. असे असले तरी कोणतीही जोखीम पत्करण्यास प्रशासनातील एकही अधिकारी तयार नाही.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT