Nagar News : नगर 'झेडपी'च्या माजी महिला सदस्याला दारूकांड प्रकरणी जामीन..

ZP Election In Pangarmal : नगर तालुक्यातील पांगरमल येथे झेडपी निवडणुकीच्या काळात १५ जणांचा झाला होता मृत्यू.
Bhagyashree Mokate
Bhagyashree MokateSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना पांगरमल विषारी दारूकांडच्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सहा वर्षापासून भाग्यश्री मोकाटे पसार होत्या. सीआयडीने त्यांना अटक झाल्यापासून त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. नगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात नगर तालुक्यातील पांगरमल विषारी दारूकांड घडले होते.

यात विषारी दारूकांडात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे यांचा समावेश होता. घटना घडली तेव्हा त्या पसार होत्या. त्यांनी काही दिवसापूर्वी सीआयडीने अटक झाली होती. नगर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीशांनी भाग्यश्री मोकाटे Bhagyashree Mokate यांना जामीन मंजूर केला.

Bhagyashree Mokate
Manoj Jarange Patil: माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज जरांगेंची तोफ धडाडणार...

सहा वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी 2017 रोजी नगर Nagar जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांसाठी आयोजित केलेल्या जेवणावेळी विषारी दारूचे सेवन केल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, दोघांना अंधत्व आले तर एक अपंग झाला होता. यानंतर पुढे या विषारी दारूकांडात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला.

मात्र या नऊ जणांच्या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर इतरांच्या मृत्यूचा नंतर उलगडा झाल्याने नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात झालेल्या गुन्ह्याचा तपासनंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात २० जणांचा समावेश आहे. यातील राजेंद्र बबन बुगे याचा पसार असताना अपघाती, तर मोहन दुग्गल याचा नाशिक कारागृहात मृत्यू झाला. काही संशयित आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन देखील मंजूर केले. आज नगर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश गोसावी यांनी भाग्यश्री मोकाटे हिला अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जामीन झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावणे. तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करणे तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये, या अटी-शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. भाग्यश्री मोकाटे यांच्यावतीने नगर जिल्ह्यातील विधीज्ञ सतीश एस. गुगळे यांनी काम पाहिले.

Edited By : Amol Sutar

Bhagyashree Mokate
Assembly Winter Session 2023 : अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची नेमप्लेट हटवली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com