Assembly Winter Session 2023 : आमदार धंगेकर पहिल्याच दिवशी सरकारला घेरणार

Maharashtra Assembly Winter Session 2023 : पुणे शहरातील आठ आमदारांपैकी धंगेकर काँगेसचे एकमेव आमदार आहेत.
MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session 2023 : पुणे शहरातील कसबा पोटनिवडणुकीत राज्यभरात जोरदार चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

पुण्यात घडलेले ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांकडून होत नसलेली कारवाई, ससून रुग्णालयातील तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर असलेला राजकीय वरदहस्त या महत्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याची तयारी आमदार धंगेकर यांनी केल्याचे समजते. 

पुणे शहरातील आठ आमदारांपैकी धंगेकर (Ravindra Dhangekar) काँगेसचे एकमेव आमदार आहेत. भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर काँगेसच्या (Congress) तिकिटावर विजयी झाले आहेत.

शिवसेनेत (Shiv Sena) बंड होऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते.

MLA Ravindra Dhangekar
Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांची आजपासून अग्निपरीक्षा; विरोधकांबरोबर 50 मोर्चांना थोपविण्याचे आव्हान

पुणे महापालिकेत तीन टर्म स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांचा पराभव धंगेकर यांनी केला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'कोण धंगेकर'? असा प्रश्न करत त्यांची खिल्ली उडविली होती.

त्यानंतर या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देतात आमदार धंगेकर यांचा 'मी धंगेकर' हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार धंगेकर राज्यातील कानाकोपऱ्यात प्रसिध्द झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई येथे झालेल्या आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार धंगेकर यांनी कामाची चुणूक दाखवली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. आता पुणे शहरासह राज्यातील तरुणाई मध्ये वाढत असलेल्या ड्रग्जच्या समस्येवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे.

ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला होता. यामध्ये ससून मधील डॉक्टरांचा सहभाग असून यामध्ये लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

त्यानंतर झालेल्या तपासामध्ये यामध्ये तथ्य असल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन देखील त्यांनी सुरू केले होते.

MLA Ravindra Dhangekar
Nagpur Winter Session 2023 : आरक्षण, अवकाळी नुकसान, आरोग्य विभाग भ्रष्टाचार विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

ड्रग्ज प्रकरणातील तीन ते चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अद्यापही ससून मधील डॉक्टर, तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून सरकारी यंत्रणेला जागे करण्याची तयारी आमदार धंगेकर यांनी केली आहे.

(Edited By – Rajanand More)

MLA Ravindra Dhangekar
Assembly Winter Session 2023 : अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची नेमप्लेट हटवली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com