मुंबई : राज्यपाल (Governor) सर्वच विषयांवर कायदेशीर सल्ला घेत असतात त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी, खाजगी सचिव नेमणूक याविषयावरसुध्दा राज्यपाल कायदेशीर सल्ला घेतील, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना लगावला आहे.
राजभवनात निवृत्त अधिकाऱ्याला नियमित पदावर नियुक्त करण्यात आलेल्या विषयावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर मलिक यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
निवृत्त अधिकार्याला जे नियमित पद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही. मात्र, राजभवनातून तसे आदेश निर्गमित झाले आहेत. हजारोंच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यात काम करतात. त्यातील एखादा अधिकारी निवडण्याचा अधिकार राजभवनाला आहे. मात्र, निवृत्त अधिकाऱ्याला त्या पदावर नियुक्त करणे हे अनियमित कामकाज आहे. हा नियमांचा भंग आहे. राजभवनातून नियमांचा भंग होणे हे अपेक्षित नाही, असे मलिक म्हणाले.
राजभवनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही ही जबाबदारी असते किंवा त्यांनी नियम भंग होणार नाही याची खात्री केली पाहिजे. मात्र, एखादा अधिकारी निवृत्त झाला तरी त्याच्यासाठी इतका मोह कशाला?, असा सवालही मलिकांनी केला आहे. जसे कायदेशीर सल्ले राज्यपाल घेतात त्याप्रमाणे याविषयी सुद्धा सल्ला घेतील व त्या निवृत्त अधिकाऱ्याला रिलीफ करतील, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली. व राज्यपालांना टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्याचे राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मुद्यावर याआधी सुद्धा अनेकदा खटके उडाले आहेत. या प्रत्येकवेळी राज्यापाल हे कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ, असे उत्तर द्यायेचे नेमके त्यांच्या याच उत्तराची खिल्ली मलिकांनी उडवली आणि आता निवृत्त अधिकाऱ्यांची राजभवनात नियुक्तीवरून त्यांना लक्ष केले असून कोश्यारींना खोचक टाेलाही लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.