अँटिलिया स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड; NIA त्यांना वाचवतेय..

मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांच्यावर जोरदार टीका केला आहे.
nawab malik, parambir singh
nawab malik, parambir singhsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) हे अँटालिया प्रकरणातील मास्टरमाईंड आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)वाचवत आहे. या प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार (central government) आटोकाट प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. याबरोबरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सिंग यांच्याबाबच दिलेली माहिती खरी असल्याचा दावाही मलिकांनी केला आहे. ते गुरुवारी (ता.3 फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते.

nawab malik, parambir singh
एक मुलगा तुरुंगात, दुसऱ्यावर गुन्हा दाखल : नारायण राणे आहेत कुठे?

मलिक म्हणाले, सिंग हे केवळ देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांनी काही स्टेटमेंट दिली असेल. मात्र, सर्वच स्टेटमेंट खरेच असतात असे नाही. शिवाय ज्याच्यावर आरोप आणि संशय आहे त्या व्यक्तिच्या स्टेटमेंटवर तर अधिक शंका असते. तसेच, सचिन वाझे हा सिंह यांच्याच टोळीचा एक भाग होता. सिंह हे ठाण्यात पोलीस आयुक्त असतानाही त्यांचे भाजपच्या नेत्यांना हाताशी धरुन अनेक उद्योग सुरु होते. वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा माझ्यावर दबाव होता, असा आरोप सिंह यांनी केला. मात्र, सिंह यांनीच सरकारची दिशाभूल केली आणि स्वत: अधिकाऱ्याला नियुक्त केले आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

nawab malik, parambir singh
धक्कादायक : उमेदवारी अर्ज भरताना योगींच्या मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रीय तपास यंत्रणा व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मलिकांनी सडकून टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन केंद्राकडून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांविरुद्धही ईडी याचप्रकारे कारवाई करत आहे. देशभरातही केंद्रीय तपास यंत्रणांकडून हेच उद्योग सुरु आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी, सरकार झुकत नाही हे पाहून भाजपकडून वेगवेगळे डावपेच खेळत आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी, महाविकासआघाडीचा कोणताही नेता या दबावाला बळी पडणार नाही, असे मलिकांनी ठणकावले आहे.

दरम्यान, वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्याची शिफारस ही मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात झालेली नाही. वाझे हा पोलीस दलातून निलंबित झाला असला तरी तो सिंहासाठी कार्यरत होता. ज्याठिकाणी सिंहांची पोस्टिंग व्हायची, त्याठिकाणी वाझे असायचा. सिंह यांची एक पोलीस अधिकाऱ्यांची एक टोळीच होती, असा घणाघातही मलिकांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com