"मुख्यमंत्री त्यातले नाहीत, पण ढवळ्या शेजारी पवळा अशी त्यांची अवस्था"

Wine | Mahavikas Aaghadi : सुपर मार्केटमध्ये सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.
Uddhav Thackeray - Ajit Pawar
Uddhav Thackeray - Ajit Pawar Sarkarnama

सातारा : दारू आणावी, मंदिरे बंद करावी, वाड्या-वस्ती बंद करावी, अशा विचाराचे पुढारी उद्धव ठाकरे नाहीत. पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. यातील ढवळा उपमुख्यमंत्री अजित पवार असून त्यांच्या शेजारी हा पवळा बांधला. त्यामुळे त्यांनी वाईन विक्रीचा निर्णय घेऊन टाकला, अशी टीका हभप बंडातात्या कराडकर यांनी केली. बंडातात्या कराडकर व विलासबाब जवळ यांच्या नेतृत्वात व्यसनमुक्त युवक संघटनच्यावतीने आज साताऱ्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाच्या निषेधार्थ दंडवत-दंडुका आंदोलन केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दंडवत घालून या आंदोलनाची सुरवात झाली. त्यानंतर व्यसन मुक्त युवक संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. पोलिस प्रशासनाकडून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी बंडातात्या कराडकर हे अचानक उपस्थित झाले. यावेळी त्यांनी शासनाच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री निर्णयावरून अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार आहे. पण, यासंदर्भात निर्णय घेताना जनता व व्यसन मुक्त युवक संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही. यावेळेस आमच्याशी मुख्यमंत्री बोलले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray - Ajit Pawar
अमित शहांना वादात ओढणं नितेश राणेंना पडलं महागात!

राज्य सरकारने नुकतेच वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. एक हजार चौरस फूटापेक्षा मोठ्या दुकानांत शोकेस निर्माण करून वाईन विकता येणार. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळू शकणार आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपसह इतर धार्मिक संघटनांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होत असून टीकाही केली जात आहे.

Uddhav Thackeray - Ajit Pawar
मोठी घडामोड : परब हल्ल्याचा कट पुण्यात आखला; राणेंना तपासासाठी पुण्याला हलवणार

निर्णय मागे घेण्याचे संकेत

राज्य सरकारचा वादग्रस्त ठरलेला वाईनविक्रीचा हा निर्णय चौफेर टीकेनंतर आता मागे घेण्याची शक्यता आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एक विधानावरुन या चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फारसा महत्वाचा विषय नाही. मात्र जर सर्व स्तरातून विरोध होत असेल आणि सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे आपल्याला वाईट वाटण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत त्यांनी निर्णय मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com