Bharat Bhalke-Bhagirath Bhalke&Family Sarkarnama
विशेष

Pandharpur Politics: वडिलांनंतर... मुलालाही मुख्यमंत्र्यांनी पाठविले विमान; विजयदादांना पराभूत करणाऱ्या भारत भालकेंसाठीही चव्हाणांनी ‘प्लेन’ पाठविले होते

Bharat Bhalke-Bhagirath Bhalke: मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलविण्यासाठी भालके पिता-पुत्रांना विशेष विमान पाठविण्याचा दुर्मिळ राजकीय घटना आहे.

विजय दुधाळे

Solapur News : पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना बुधवारी (ता. ७ जून) भेटले. भालकेंसाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी चार्टर फ्लाइट पाठविले होते. त्याची विशेष चर्चा महाराष्ट्रात झाली. पण भगीरथ यांचे वडिल (स्व) आमदार भारत भालके यांच्यासाठीही २००९ मध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भेटीला येण्यासाठी विशेष विमान पाठविले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलविण्यासाठी भालके पिता-पुत्रांना विशेष विमान पाठविण्याचा दुर्मिळ राजकीय घटना आहे. (After Bharat Bhalke, the Chief Minister sent a special plane for Bhagirath Bhalke)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे पुण्याहून विशेष विमानाने हैदराबादला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर यांच्याशी बंद दरवाजाआड तासभर चर्चा केली. त्याचा तपशील समजला नसला तरी आपण अजून भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेला नाही. सोलापुरात आल्यानंतर ज्येष्ठ नेतेमंडळी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल आहे.

भेटीला येण्यासाठी केसीआर यांनी भालके यांच्यासाठी विशेष विमान पाठविले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे सोलापुरातून त्याचे टेक ऑफ होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना पुण्यातून जावे लागले. मात्र, भालके यांच्यासाठभ विमान पाठविण्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. यापूर्वीही २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्यासाठीही तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विशेष विमान पाठविले होते.

विधानसभेच्या त्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढले होते. त्या निवडणुकीत भारत भालके हे ‘रिडालोस’कडून मैदानात उतरले होते. विजयदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. त्या निवडणुकीत भारत भालके यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता. विजयदादांसारख्या बलाढ्य नेत्याचा पराभव करून भारत भालके हे महाराष्ट्रातील 'सुपर जायंट किलर' ठरले होते.

मोहिते पाटलांचा पराभव केलेले भारत भालके यांच्यासाठी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष विमान पाठविले होते. भारत भालके हे त्यावेळी सोलापूरच्या विमानतळावरून त्या विशेष विमानाने काँग्रेस नेत्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. भगीरथ भालके यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्री विमान पाठविल्याने भारत भालके यांच्या त्या आठवणीला उजाळा मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT