Sharad Pawar News Sarkarnama
विशेष

Sharad Pawar News : आधी इशाऱ्याची भाषा, आता मनधरणी : अजित पवारांना असा काय साक्षात्कार झाला?

Amol Jaybhaye

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर विधानसभेचे हे पहिले अधिवेशन. या अधिवेशनात अजितदादांचा गट आणि राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवारांचा गट आमने-सामने येणार हे निश्चित असतानाच नव्या घडामोडींनी राष्ट्रवादी आणि राजकीय वर्तुळ चक्रावून सोडणाऱ्या काही घटना पुढे आल्या. त्या अजितदादांनी घडवून आणल्या की त्यांच्यासोबतच्या इतर मंत्र्यांनी पुढाकार घेतला.काही असो पण आधीचा तोरा आणि आताची नरमाईची भूमिका यावरुन अजित पवार यांच्या गटामध्ये असुरक्षततेची भावना निर्माण झाली असावी, अशी चर्चा सुरु आहे.

मुंबईत रविवारी अधिवेशनाची लगबग सुरू होती. आशात अधिवेशनासाठी अनेक आमदार नेते मुंबईत दाखल झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकामध्ये अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा सुरु होती. काँग्रेस, राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चर्चा करत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना फोन आला ते तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पोहचले. त्याच वेळी अजित पवार आपल्या नवनिर्वाचित मंत्र्यासह पवारांच्या भेटीला आल्याचे सांगण्यात आले.

रविवारच्या भेटीची चर्चा सुरु होतीच की आज सोमवारी पुन्हा अजित पवार (Ajit Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना पुन्हा भेटायला आले. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर आमदार भेटले. रविवारी पटेल यांनी जी विनंती शरद पवार यांना केली होती, की राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिली पाहिजे. याचा विचार करावा, हीच विनंती आज पुन्हा आमदारांच्या वतीने करण्यात आली. यावर मात्र, कालच्या प्रमाणेच पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

अजित पवार यांच्या बंडानंतर पाच जुलैला राष्ट्रवादीचे दोन मेळावे झाले. पहिली मेळावा शरद पवार यांच्या नेतृत्वात तर दुसरा मेळावा अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला. या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पवारांच्या वयावर बोलताना आता ८२ झाले ८३ झाले तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा थेट सवाल केला. तसेच तुम्ही राज्यात सभा घेतल्या तर मलाही उत्तर द्यावे लागेल, असे सांगून अजित पवारांनी इशाराच दिला होता. अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदी निवड केली, असे पत्र निवडणूक आयोगाला दिले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले होते.

या मेळाव्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागली. खाटे वाटपाची चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी दिल्ली दौराही केला. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली, यानंतर खातेवाटप झाले.

अजित पवार यांच्यावर दिल्ली दौऱ्यामुळे जोरदार टीका झाली. यानंतर अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी अचाणक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, 'सांभाळून घेरे विठ्ठला' तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पवारांना नमस्कार केला. आधी पवारांना इशारा देणाऱ्या अजित पवार गटाला नेमका काय साक्षात्कार झाला की त्यांना पवारांची भेट घ्यावी लागली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT