NCP MLA News: शरद पवार की अजितदादा; राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिताफीने काढला मार्ग

NCP MLAs Present In Monsoon Session: विधिमंडळात हे आमदार उपस्थित होते
Monsoon Session of Maharashtra Assembly
Monsoon Session of Maharashtra AssemblySarkarnama
Published on
Updated on

NCP News : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचे म्हणजे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे किती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूला किती आमदार असतील याचा फैसला आज (ता.१७) होणार होता. त्यातून पक्षीय पातळीवर कुणाचे पारडे जड आहे, याचाही निकाल लोकांपुढे येणार होता. मात्र, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह कामकाजकडे पाठ फिरवली.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांना नेमके किती आमदारांचे पाठबळ आहे, याचा निश्चित आकडा कळू शकला नाही. त्यामुळे अधिवेशनामध्येही कोणते आमदार कुणाच्या बाजून आहेत, याचा आकडा समजू शकला नाही. कोणत्या गटात कोण आहे हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणेच टाळले.

Monsoon Session of Maharashtra Assembly
Rajya Sabha Election: सत्ताधारी विरोधकांच्या गदारोळातही राज्यसभेचे उमेदवार बिनविरोध; एस. जयशंकर यांच्यासह 'या' नेत्यांची निवड

अधिवेशनामध्ये शरद पवार समर्थक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील, रोहीत पवार, मानसिंग नाईक हे आमदार उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या बाजूने नऊ मंत्री आणि बबन शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंके, किरण लहामटे, सुनील शेळके, सरोज अहिरे उपस्थित होते. इतर आमदारांनी मात्र, सभागृहात जाणे टाळले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून कुणाकडे किती आमदार आहेत. याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदारांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा असल्याचे सांगितले होते. तर शरद पवार यांच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली होती. तर काही आमदारांनी भूमिकाच स्पष्ट केली नव्हती.

Monsoon Session of Maharashtra Assembly
Pune Political News: राजा बराटे-सुशील मेंगडेंचं बिनसलं ! कर्वेनगरात रंगणार दोस्तीत कुस्ती ?

मात्र, रविवारी (ता. १६ जुलै) अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. या भेटीमध्ये मंत्र्यांनी शरद पवार यांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिली पाहिजे. याचा विचार करावा, अशी विंनती त्यांना केली होती.

त्यानंतर आज सोमवारीही राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यामुळे अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी शरद पवार यांची अचाणक भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळ बुचकळयात पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदही गोंधळले, त्यामुळे अनेक आमदारांनी विधीमंडळाच्या कामकाजात हजेरी लावली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com