Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra Fadanvis Sarkarnama
विशेष

'अजितदादा, संधी असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही' : फडणवीसांनी ठेवले दुखऱ्या नसेवर बोट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अजितदादांनी (Ajit Pawar) आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या. कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण, एका गोष्टीचं दुःख आहे. संधी मिळालेली असतानाही पवारसाहेबांनी (Sharad Pawar) तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुम्हाला २००४ मध्ये संधी होती. मात्र, मुख्यमंत्रीपदी तुम्हाला काय संधी मिळाली नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. (Ajitdada, Pawar Saheb did not make you Chief Minister despite the opportunity : Fadnavis)

अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावंर चर्चा करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी तेवढ्याच मिश्किलपणे उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विधानसभेतील भाषण ऐकलं. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ते रोखठोक भाषणासाठी ओळखले जातात. मात्र, आज जे भाषण झालं. ते शंभर टक्के अजित पवार यांचे वाटत नव्हते. त्यातील ५० टक्के भाषण जयंतरावांचंदेखील (जयंत पाटील) वाटत होतं. जयंतराव सभागृहात नसल्यामुळे अर्धे भाषण त्यांनी लिहून दिले, असा भास दादा तुमच्या भाषणातून होत होता.

वीजजोडसंदर्भातील आदेश मी ट्विट केला. तो सर्वांना पाठवला आहे, तो दादा तुम्हाला कसा काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्विटरवर फॉलो करा. म्हणजे सरकारचे सर्व निर्णय तुम्हाला समजतील. दादा मला उपमुख्यमंत्री म्हणून फॉलो करतात, तर मी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना फॉलो करतो. दादांनी भाषणात सांगितलं की एकदा अमृता फडणवीस यांच्याशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्रावहिनींना विचारलं होतं का, असा खडा सवालही फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, अजितदादांनी भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या. कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण एका गोष्टीचं दुःख आहे. संधी मिळालेली असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुम्हाला २००४ मध्ये संधी होती. तुमचे (राष्ट्रवादी काँग्रेसचे) जास्त आमदार निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री असा होता. पण, ती संधी काय तुम्हाला मिळाली नाही. पण जाऊद्या मी त्यावर जास्त काही बोलत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT