Pune News : खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे बहुआयामी व्यक्तीमत्व.... राजकारणापासून अगदी तमाशापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून साताऱ्यातील छोट्यातील छोट्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर अधिकारवाणीने भाष्य करणारे नेतृत्व म्हणजे खासदार पाटील. त्यांचा व्यासंग हा वारकरी संप्रदायापासून...साहित्य आणि सिनेमापर्यंत आहे. आता त्याच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नातवाने आपल्या आजोबांचे नाव काढलं आहे. आजोबांबरोबरच पाटील पिता-पुत्राचीही (सारंग पाटील-अंशुमन पाटील) चर्चा साताऱ्यात रंगली आहे. (Anshuman Patil was presented with 'The Spirit of the Bishop' award)
साताऱ्याचे (Satara) खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचा नातू अंशुमन सारंग पाटील याला नुकताच पुण्यातील (Pune) बिशप स्कूलचा 'द स्पिरिट ऑफ द बिशप' पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे अंशुमनने अगदी शालेय वयातच आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचे आणि कोडकौतुकाचे वातावरण आहे.
श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या शालेय जीवनात अनेकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. तशीच कामगिरी त्यांचा नातू अंशुमन यानेही आता बारावीत शिकत असतानाच केली आहे. त्यामुळे अंशुमन भविष्यात आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात व प्रशासनात भरारी घेणार का?, अशीही चर्चा सध्या साताऱ्यात रंगली आहे.
खासदार पाटील यांचे शालेय शिक्षण कराडमध्ये झाले. त्यावेळी ते मॅट्रिकमध्ये टॉपर होते. त्यांनी शालेय जीवनात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वक्तृत्व हे तर त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारे विद्यार्थी म्हणून पाटील यांची ओळख होती. पुण्यातील महाविद्यालयीन जीवनातही हीच कामगिरी त्यांनी कायम ठेवली होती. तीच वाटचाल कायम ठेवत त्यांनी जिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली हेाती.
अंशुमन पाटील हा श्रीनिवास पाटील यांचा नातू पुण्यातील बिशप स्कूलमध्ये शिकत आहे. त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. तोही आजोबांसारखा उत्तम वक्ता आहेच. त्याशिवाय तो इतर क्षेत्रातही चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला शाळेने 'द स्पिरिट ऑफ द बिशप' हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. विशेष बाब म्हणजे अंशुमनचे वडील सारंग पाटील यांनाही बारावीत अशाच पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
आजोबा आणि नातवामध्ये शैक्षणिक चर्चेबरोबर राजकारणाच्या गप्पा रंगतात. राजकारणातील अनेक डावपेच आणि बारकावे हे अंशुमन हा आजोबांकडून समजून घेत असतो. त्यामुळे अंशुमन हाही आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात येणार का, याची चर्चा कराडमध्ये सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.