Jayant Patil On Ajitdada's CM Post: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर जयंत पाटलांचे भाष्य; म्हणाले, ‘सध्याच्या गणितात...’

Maharashtra Politic's : अमोल मिटकरींनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण....
Jayant Patil and 
Ajit Pawar
Jayant Patil and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. अजितदादा हे सध्याच्या गणितात मुख्यमंत्री कसे होऊ शकतात, हे कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत भाष्य केले. (Jayant Patil's reaction on Ajitdada's Chief Ministership talk)

आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण मिटकरी यांनी ट्विट करायचे आणि मी त्यावर बोलायचं म्हणजे जरा… असे सांगून जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, राज्यात नवीन समीकरण तयार होईल, असं मला तरी वाटत नाही.

Jayant Patil and 
Ajit Pawar
Wai BJP News : नवीन राजकीय समीकरणांमुळे निष्ठावंतांची अडचण : नरेंद्र पाटील

मुख्यमंत्री शिंदे हे काही कामं असतील, म्हणून दिल्लीला गेले असावेत. यावेळी तर ते संपूर्ण कुटुंब घेऊन दिल्लीला गेले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. अजितदादा मुख्यमंत्री कसे होऊ शकतात, हे कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही.

दरड कोसळून जीवितहानी होणे, ह्या गोष्टी टाळण्यासाठी सावधानतेचा इशारा देणं, दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करणे या गोष्टी प्रशासनाने यापूर्वी करायला हव्या होत्या. आता महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशा ठिकाणी सरकारी यंत्रणा पोचत नाही, ही सर्वांत मोठी काळजी आहे. ही यंत्रणा लवकर पोचली पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने करणे आवश्यक आहे. त्यात सरकार कुठेतरी कमी पडतंय. सरकारने त्या गोष्टीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

Jayant Patil and 
Ajit Pawar
Ajit Pawar News : मानलं अजितदादांना ! एका झटक्यात राष्ट्रवादी-शिंदेंच्या आमदारांना २५-२५ कोटी वाटले...

वन विभागाचा मज्जाव

जयंत पाटील म्हणाले की, माळीणच्या घटनेनंतर असे ठरलं होतं, ज्या ठिकाणी अशा वस्ती आहेत, त्यांना स्थलांरित करण्याचे ठरले हेाते. मात्र, लोकांची मागणी ज्या ठिकाणी हेाती, त्या जमिनी देण्यास वनविभागाकडून मज्जाव करण्यात आला, त्यामुळे दुर्दैवाने इर्शाळवाडीची घटना घडली आहे.

Jayant Patil and 
Ajit Pawar
Kolhapur News : मुश्रीफांच्या ऑफरवर स्पष्ट बोलत, सतेज पाटलांनी ठोकला लोकसभेच्या जागेवर दावा

आठवडाभरात विरोधी पक्षनेता जाहीर होईल

ज्यांचा पक्ष मोठा आहे, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्यासाठी नाव सूचविणे आवश्यक आहे. मला अपेक्षा आहे की, काँग्रेस पक्षाकडून ही निवड लवकरच कळविली जाईल. आज किंवा उद्या ती कळविली जाईल आणि येत्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकते, असं मला वाटतं, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com