Rahul Narwekar-Balasaheb Patil Sarkarnama
विशेष

Narwekar Offer To Balasaheb Patil : विधानसभा अध्यक्षांची शरद पवार गटातील बाळासाहेब पाटलांना मंत्रिपदाची ऑफर!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यात कराडचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : बाळासाहेब, त्यांनी (ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन) मांडलेल्या मुद्यावर उत्तर द्यायला तुम्हाला मंत्री बनावं लागेल, अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार बाळासाहेब पाटील यांना सभागृहातच मंत्रिपदाची ऑफर दिली. (Assembly Speaker offers NCP MLA Balasaheb Patil a ministerial post!)

दरम्यान, त्याचवेळी विरोधी बाकावरून मंत्रिमंडळाती सर्व जागा आता फुल्ल झाल्या आहेत, अशी टिपण्णी केली. त्यावरही नार्वेकर यांनी एक रिकामी आहे ना, असे उत्तर दिले. त्यामुळे ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची ऑफर बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) किती मनावर घेतात, हे पहावे लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यात कराडचे आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. त्यांनाच विधानसभा अध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे ऑफर दिल्याची चर्चा विधानमंडळ परिसरात रंगली होती.

विधानसभेत आज महाराष्ट्र पशु व मत्स्यविकास मंत्रालयाचे विधेयक विधानसभा अध्यक्षांनी मांडले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना आता २५ की २७ क्रमामांचे विधयेक मांडले आहे, असा प्रश्न केला. त्यावर अध्यक्षांनी २५ असे उत्तर दिले. मात्र, मंत्री बोलत असताना आमदार रवींद्र वायकर यांना त्या बिलावर बोलायचे होते.

रवींद्र वायकर बोलायला उठले आणि म्हणाले की, आम्ही विधेयक २५ वर बोलत आहे. त्यात महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ स्थापन अधिनियम १९९८ मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या बिलावरच बोलत आहे. मुंबईला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा असतानाही मत्स्य विद्यापीठ दुसरीकडे तुम्ही नेलेले आहे. वायकर हे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.

तेवढ्यात विधानसभा अध्यक्षांनी वायकर यांना सूचना केली की तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे का देत बसलात. तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना. त्यावर आमदार वायकर यांनी सांगितले की ते माझ्या बोलण्यात जाणून बुजून अडथळे आणत आहेत. मी तुम्हाला संपूर्ण संरक्षण देतो, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, अशी सूचना पुन्हा नार्वेकर यांनी केली.

तेवढ्यात कराडचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील उठले आणि म्हणाले की, आमदार वायकर हे बिलावरच बोलत आहेत. ते बोलत असताना मंत्री गिरीश महाजन हे सातत्याने २३ नंबर बिल घ्या, असा धोशा लावत आहेत. हे कसं काय शक्य आहे. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मंत्र्यांनी मांडलेल्या मुद्यावर तुम्हाला उत्तर देण्यासाठी मंत्री व्हावे लागेल, असे सांगत मंत्रिपदाची ऑफर सभागृहातच देऊन टाकली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT