Assembly Session : अजितदादा, तुमचं आमचं काही वैर नाही, पण तुमच्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे; नाना पटोलेंचे आवाहन

दादा, आमची एकच विनंती आहे की अजूनही काही बिघडलं नाही.
Ajit Pawar- Nana Patole
Ajit Pawar- Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजितदादा, तुमचं आमचं काही वैरत्व नाही. तुम्ही आमच्या आमदारांना निधी दिलेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आहेत आणि अजितदादा तर फार निर्मळ मनाचे आहेत. त्या निर्मळ मनाचा वापर झाला पाहिजे. आमच्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात २५-२५ कोटी द्या आणि वाद संपवून टाका, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्याकडे केली. (Ajitdada, you have no enmity with us : Nana Patole)

राज्य सरकारने सादर केलेल्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील २०१९, २०२० आणि २०२१ म्हणजेच महाविकास आघाडी सरकाच्या काळात जे सूत्र निधी वाटपाचे ठरले हेाते, त्यानुसारच आताही निधी वाटप करण्यात आलेला आहे, असे सांगितले. त्यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तर दिले.

Ajit Pawar- Nana Patole
Assembly Session : यशोमतीताई, भावाच्या नात्याने ओवाळणी देतो; पण सावत्र भावाप्रमाणे मला बघू नका; अजितदादांचा टोमणा

नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हेच उपमुख्यमंत्री होते. अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास दिलेला होता. त्या पद्धतीचा त्रास त्यांना द्यायला पाहिजे होता. त्यात आमचा काय दोष आहे. (अजितदादांनी आम्हाला त्रास दिला, असे शिंदे गटाचे आमदार बाहेर सांगतात, म्हणून मी बोलतोय) आमच्या लोकांच्या मतदारसंघामध्ये निधी मिळालेला नाही

Ajit Pawar- Nana Patole
Congress News : काँग्रेसला पुन्हा झटका;आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांची आठवण करून देत नाना पटोले हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होऊ नये; म्हणून त्यांनी विधेयकावरील त्या सूचना केवळ वाचून दाखवाव्यात, अशी विनंती केली आहे.

Ajit Pawar- Nana Patole
Jayant Patil's Fund : जयंत पाटलांना ५८० कोटींचा निधी?; जयंतरावांनी सभागृहातच आकडा जाहीर केला...

फडणवीस यांना पटोले यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की आमचे मित्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही नियमांचे पालन करावे. पण, तुम्ही करत नाही; म्हणून आम्ही हे आयुध वापरत आहोत. वेदना असतात, त्याही मांडायच्या असतात. आम्ही ज्या आयुधाचा वापर केला आहे, तो वेदनांचा आहे. ह्या ज्या वेदना आहेत, त्या होऊ नयेत, यासाठी तुम्ही काय करत नाही म्हणून आम्हाला या आयुधाचा वापर करावा लागतो. दादा, तुमचं आमचं काही वैरत्व नाही. पण, तुम्ही आमच्या आमदारांना निधी दिला नाही. तुम्ही एक दोन नावं देत आहात, पण तो तुमचा भाग आहे.

Ajit Pawar- Nana Patole
Assembly Session: आम्ही सत्तेत आलो; म्हणजे तुम्ही काहीही निर्णय घ्यावा, असे गृहीत धरू नका; राष्ट्रवादीच्या शेळकेंचा सरकारला इशारा

अर्थमंत्र्यांनी तातडीने बैठक लावून ज्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यावरील स्थगिती उठवून ती तातडीने सुरू केली पाहिजेत. एकतर्फी पद्धतीने विधानसभेचे कामकाज चालणार असेल तर लोक पाहतात. अजितदादांनी जेव्हा मागील काळात असे निधीवाटप झाले, असे सांगून हसत होते, तेव्हा राज्यातील जनता पाहत होती, असेही सूचक विधान पटोले यांनी केले.

Ajit Pawar- Nana Patole
Assembly Monsoon Session : बाळासाहेब थोरातांचे भुजबळ-भुसेंना चिमटे; ‘तिकडं गेल्यामुळे गप्प बसले, नाहीतर आपण आरडाओरडा केला असता’

नाना पटोले म्हणाले की, दादा, आमची एकच विनंती आहे की अजूनही काही बिघडलं नाही. आमच्या लोकांनी काही चूक केलेली नाही. तुम्ही सुधारणा केली तर तुमची सुधारणा तुम्हाला लखलाभ. आम्ही आाणि आमच्या मतदारसंघातील लोकांनी काही चूक केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना निधी मिळावा. आमच्या निधीसंदर्भात तातडीने बैठक लावावी, अशी आमची विनंती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com