Ajit Pawar&BJP Leader Sarkarnama
विशेष

हर्षवर्धन पाटलांनी आग्रह धरला अन्‌ अजितदादा आणि फडणवीस एकमेकांच्या शेजारी बसले!

भाजप नेत्यांच्या मांदियाळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी उठून दिसत होती.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांच्या विवाह सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा एकत्र आले होते. हे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर बसून हितगूज करत होते. यापूर्वी हे दोन्ही नेते करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या मुलाच्या लग्नासाठी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. (Attendance of Ajit Pawar and Devendra Fadnavis at wedding of MP Sanjay Patil's son)

खासदार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला राज्यातील बहुतांश भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. त्या देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, कपिल पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रामेश्वर तेली, याचबरोबर भाजपचे मित्रपक्ष असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश होता. या सर्व भाजप नेत्यांच्या मांदियाळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी उठून दिसत होती.

उपमुख्यमंत्री पवार हे भाजप नेत्यांच्या अगोदर लग्नस्थळी उपस्थिती लावली होती. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकाच सोप्यावर बसले होते. त्यानंतर फडणवीस आणि भाजप नेते व्यासपीठावर आले. त्यावेळी पवारांनी फडणवीस यांच्यासोबत हस्तांदोलन केले. फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना अजित पवार यांच्याशेजारी बसण्यास हाताने सूचविले. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस आणि पवार यांनी एकत्र बसावे, असा आग्रह धरताच ते दोघेही शेजारी-शेजारी बसले होते. संपूर्ण मंगलाष्टक पूर्ण होईपर्यंत पवार-फडणवीस हिजगूज करत होते.

दरम्यान, यापूर्वी हे दोन्ही नेते करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नासाठी एकत्र आले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच हे दोन्ही एकाच व्यासपीठावर येणार होते, त्यामुळे त्याबाबत मोठी उत्सुकता होती. त्यानंतर पुन्हा एकदा संजय पाटील यांच्या मुलांच्या लग्नासाठी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. या लग्न सोहळ्यात मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT