बारामती : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांचा उल्लेख माझ्याकडून चुकून पियूष गोयल (Piyush Goyal) असा झाला, त्यावेळी त्यांना कसं तरी झालं. पण, पियुष गोयल तुमच्यापेक्षा मोठी व्यक्ती आहेत, तुम्हीही पियुष गोयल यांच्यासारखं मोठं व्हा, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत तालुक्यात बोलताना व्यक्त केली. (Ayush Prasad, grow up like Piyush Goyal : Ajit Pawar)
नाम फाउंडेशन, पुणे जिल्हा परिषदेच्या मदतीतून बारामती तालुक्यातील भिलारवाडी येथील तलावातील गाळ उपसण्याच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. कार्यक्रमास नाम फाउंडेशनचे समन्वयक आणि नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी पवार बोलत होते.
कोण तुम्हाला असल्या उन्हात येऊन मदत करणार आहे. पण, मल्हार पाटेकर हा कलावंताचा मुलगा आहे, तरुण आहे. कुणालाही वाटेल मजा करावी. निवांत राहावे. पण, सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी मल्हार हे भर उन्हात आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. चांगल्या कामासाठी झटत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे चिरंजीव आणि नाम फाउंडेशनचे समन्वयक मल्हार पाटेकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.
भिलारवाडीत आज १ कोटी ३२ लाखांचे काम होत आहे. आपण शब्द टाकला आणि सीरमकडून या काामासाठी निधी मिळाला. त्यांना काय पडलं होतं, या कामाचं. पण आपले प्रयत्न सुरू असतात. एकाच आईबापाच्या पेाटी जन्मलेले सख्खे भाऊ बांधावरून एकमेकांना कुऱ्हाड घेऊन हाणायला निघतात, असा चिमटाही बांधावरून भांडणाऱ्याला त्यांनी काढला.
अजित पवार म्हणाले की, नागरिकांसाठी ज्या सुविधा केल्या पाहिजेत, त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हीही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा तसेच जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा एकोपा ठेवून एकत्र राहावे. एकमेकांमध्ये विनाकारण वाद घालत बसू नका. निधी पाहिजे असेल तर आमच्याकडे मागणी करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.