‘तू बोलू नकोस रे शहाण्या...तू आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेव ना’

हे चॅनेलवाले लगेच दाखवतील ब्रेकींग न्यूज बारामतीत, असं चाललंय.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

बारामती : ‘‘बारामती (Baramati) तालुक्याच्या विकासकामासाठी किती पैसे आले, हे मी सांगण्याचे काही कारण नाही. कारण, हे चॅनेलवाले लगेच दाखवतील ‘ब्रेकींग न्यूज... बारामतीत असं चाललंय. सगळीकडंच असं चालावं. बारामतीत, जिल्ह्यात, राज्यातसुद्धा. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत चालावं. (तेवढ्यात एका कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एवढा निधी आणला असे सांगत असताना त्याला मध्येच थांबवत) तू बोलू नकोस रे शहाण्या...तू आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेव ना’’, असे म्हणत अजित पवारांनी बारामती विकासनिधीबाबत बोलणे टाळले. (Ajit Pawar remained silent about the Baramati fund)

बारामती तालुक्यातील भिलारवाडी येथील तलावातील गाळ उपसण्याच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नाम फाउंडेशनचे समन्वयक आणि नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

Ajit Pawar
होय बाबा, मी आता ड्रायव्हर म्हणून बसतो : अजितदादांची टोलेबाजी!

अजित पवार म्हणाले की, नागरिकांसाठी ज्या सुविधा केल्या पाहिजेत, त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हीही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा तसेच जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा एकोपा ठेवून एकत्र राहावे. एकमेकांमध्ये विनाकारण वाद घालत बसू नका. निधी पाहिजे असेल तर आमच्याकडे मागणी करा.

Ajit Pawar
'ZP अध्यक्ष असताना जेवढं काम केलं, तेवढं चांगलं काम मंत्री असूनही करू शकलो नाही!'

पाठीमागील काळात गावाला एवढया मोठ्या प्रमाणात निधी कधीही मिळालेला नव्हता. तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यात जावा, एकाका आमदाराला पाच कोटी, दहा कोटी, पंधरा कोटी रुपये निधी मिळतो. आता तुमच्या बारामती तालुक्यात किती पैसे आले, हे मी सांगण्याचे कारण नाही. कारण हे चॅनेलवाले लगेच दाखवतील ब्रेकींग न्यूज बारामतीत, असं चाललंय. तेव्हा बारामतीच्या विकासनिधीबाबत झाकली मूठ सव्वा लाखाचीच ठेवा, असे त्यांनी मध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्याना सांगत सुनावले.

Ajit Pawar
पोलिस दलात मोठी खांदेपालट : नम्रता पाटील, मिलिंद मोहितेंसह ७८ अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या

तुम्ही मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे, त्यामुळे बारामती विभागात अजूनही विकास कामे झाली पाहिजेत. असेही आम्हाला वाटते. ती करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. येत्या सोमवारी सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांची खरीप पूर्व आढावा बैठक लावली आहे. त्यातून शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळावेत, यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

त्यासंदर्भात जास्त प्रपोगंडा न करता हे महत्वाचं काम होते. त्याच्या प्रेमापोटी मी आलेा. त्यानिमित्ताने आम्हालाही नेमकं मल्हार पाटेकर आणि गणेश काय करतात, हे पाहता आलं. तसेच पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त कामे पडून आहेत. ते कामे केली नाही तर पुढचा निधी मिळणार नाही. तुमच्या जशा आमच्याकडून अपेक्षा आहेत, तशा आमच्याही तुमच्याकडूनही अपेक्षा आहेत. दिलेला पैसा योग्यरितीने खर्च झाला पाहिजे. त्याला पाय फुटता कामा नये, असेही अजित पवारांनी सुनावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com