Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Baramati Namo Rojgar Melava : फडणवीस अजितदादांना देणार मोठी जबाबदारी; बारामतीच्या रोजगार मेळाव्यात सूतोवाच

Devendra Fadnavis praised Ajit pawar : पोलिस मुख्यालय आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले क्वॉर्टर हे सरकारी बांधकाम आहे, असे वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं. अशा प्रकारचं पोलिस मुख्यालय अजितदादांनी बारामतीकरांना दिलं आहे.

Vijaykumar Dudhale

Baramati News : उपमुख्यमंत्री अजितदादांनी बारामतीत एवढ्या सुंदर इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे मला आता मोह होतोय की, पोलिस दलाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्याचे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. आता दादा मला हळूच म्हणू शकतात, पीएमसीच का गृहखातंच मला द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण, मी माझं खातं दादांना देणार नाही. ते माझ्याकडेच ठेवीन. पण, तुमची मदत सगळ्या इमारती बांधण्यासाठी घेईन, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवी जबाबदारी देण्याचे सूतोवाच केले.

बारामती (Baramati) येथे आज कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नमो महारोजगार मेळावा (Namo Rojgar Melava) आयोजित करण्यात आला आहे. बारामतीत आज आणि उद्या हा रोजगार मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजितदादांकडे (Ajit Pawar) नवी जबाबदारी देण्याबाबत सूतोवाच केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महारोजगारासोबत अनेक चांगल्या इमारतीचे उद्घाटन केले आहे. बारामतीचे एसटी स्टॅंड एखाद्या एअर पोर्टसारखं वाटावं, असं बस स्टॅंड बारामतीला मिळालं आहे. पोलिस मुख्यालय आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले क्वॉर्टर हे सरकारी बांधकाम आहे, असे वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं. अशा प्रकारचं पोलिस मुख्यालय अजितदादांनी बारामतीकरांना दिलं आहे.

आता दोन गोष्टी होतील. पोलिस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी माझ्यामागं लागतील की, आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या. कारण एवढं चांगलं कार्यालय आणि निवासस्थान फक्त बारामतीतच उपलब्ध आहे. यानिमित्ताने अजितदादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो, तुम्ही लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे मला आता मोह होतो आहे की, पोलिस दलाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्याचे पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

अतिशय सुंदर इमारती बारामतीत झाल्या आहेत. बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या या इमारती अजितदादांनी उभारल्या आहेत. सरकारी कार्यालये चांगलीच असली पाहिजेत. ज्या ठिकाणी जनता येते त्या ठिकाणची कार्यालये चांगली असली पाहिजेत. तसेच, ती लोकाभिमुख असली पाहिजेत. चांगल्या इमारतींमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील. त्यातून लोकांच्या तक्रारी दूर होण्याचे काम होईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT