Shirur Loksabha Constituency : अजितदादांचा पुन्हा शिरूर दौरा; लोकसभेचा उमेदवार ठरणार ?

NCP News : अजित पवार शिरूर मतदारसंघाचा दौरा करून राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवाराच्या नावावर अंतिम चर्चा होऊन शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेची जागा जिंकण्याचा संकल्प सोडणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तीन ते पाच मार्च असा तीन दिवसांचा हा दौरा असून, यामध्ये लोकसभेच्या उमेदवाराच्या नावावर अंतिम चर्चा होऊन शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.

आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन अजित पवार यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये (loksabha Election) बारामती आणि शिरूर Shirur या दोन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी जाहीर केले आहे. त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवातदेखील केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar News
Shirur Loksabha Constituency : अजितदादांचा ‘दुसरा हट्ट’ही वळसे पाटील पूर्ण करणार का?

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे हेच आमचे उमेदवार असतील, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनीही शिरूरमध्ये उमेदवार उभा करून विद्यमान खासदार डॉ. कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार केला आहे. डॉ. कोल्हे Amol Kolhe यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी सुरू आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, यांच्यासह माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून Shirur Loksabha Constituency राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, यासाठी अजितदादा विशेष आग्रही आहेत. मात्र, वळसे पाटील यासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे सध्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार तीन दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर तसेच भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत तेथे सभा घेणार आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची चर्चा केली जाणार आहे.

तीन दिवसांमध्ये हा दौरा पूर्ण करत त्या भागातील पक्षाच्या प्रमुखांची चर्चा करून उमेदवार निश्चितीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दौऱ्यामधून अजितदादांना शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar News
Pune News : अखेर प्रशासनाने चूक सुधारली; पवारांना दिले निमंत्रण!

तरुण उमेदवार म्हणून अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता

लोकसभा निवडणूक भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेना पक्षाच्या मदतीने लढविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच अजित पवार यांनी जाहीर केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील बारामती लोकसभा मतदार loksabha Constituency संघाप्रमाणेच 'अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार' अशीच लढत होणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या मतदारसंघातून तरुणांना संधी म्हणून आयत्यावेळेस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे नाव आयत्यावेळेस पुढे येऊ शकते. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बहुतांश सर्वच विधानसभांचे आमदार हे तरुण असल्याने खासदारकीसाठी नवीन आणि तरुण चेहरा म्हणून पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Shirur Loksabha Constituency

Edited By : Rashmi Mane

R

Ajit Pawar News
MP Amol Kolhe: 'पद असताना माज नको! पद गेल्यावर लाज नको'; आढळराव राष्ट्रवादीकडून लढणार? अमोल कोल्हेंचा चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com