Prajakt Tanpure News : प्राजक्त तनपुरे विधानसभेत आक्रमक, अध्यक्षांनी भाषण थांबवलं अन् अजितदादा म्हणाले, "मला..."

Prajakt Tanpure In Vidhansabha : "आता अजितदादांनी सांगितलं मला येऊन भेट, म्हणजे..." असंही प्राजक्त तनपुरेंनी म्हटलं.
Ajit Pawar Prajakt Tanpure
Ajit Pawar Prajakt Tanpuresarkarnama

विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज गुरूवारी ( 29 फेब्रुवारी ) चौथा दिवस आहे. अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात सदस्यांकडून चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधासभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून एकच हशा पिकला.

Ajit Pawar Prajakt Tanpure
Raosaheb Danve In Vidhansabha : सलग पाचवेळा खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंना पुन्हा विधानसभा खुणावतेय का?

नेमकं काय घडलं?

प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी शेतकऱ्यांना रात्री देण्यात वीजेवरून सरकार घेरलं. प्राजक्त तनपुरे म्हणाले, "शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, अशी खूप दिवसांपासून अपेक्षा आहे. अर्थसंकल्पात सौर उर्जेचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी वाचला आहे. पण, शेतीपंप सौर उर्जेवर केले, तर याचा फायदा शेतकऱ्यांसह उद्योगांनाही होणार आहे. कारण, शेतकऱ्यांना सौर पॅनेल दिले, तर उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वीजबिलात कपात करता येईल. मात्र, दुर्दैवानं सरकार याकडे लक्ष देत नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"दिवसा वीज दिली जाणार असल्याचं आम्ही सतत ऐकत आलोय. प्रत्यक्षात काहीच होत नाही. वारंवार जनतेच्या भावना आम्ही विधानसभेत मांडत आलोय. महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे चार प्रकल्प होते. अजितदादांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर उरलेल्या प्रकल्पांकडे कुणी पाहतच नाही. प्रकल्पांचे काम झाले असते, तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकली असती. पण, पुढं काम झालेलं नाही," अशी खंत प्राजक्त तनपुरेंनी व्यक्त केली.

Ajit Pawar Prajakt Tanpure
PMC Sealed Deccan Mall : मॉलचा मिळकत कर राणे कुटुंबीयांच्या नावानं, पण पालिकेचं अजबच स्पष्टीकरण; चर्चांना उधाण

यावेळी तालिका अध्यक्षांनी प्राजक्त तनपुरेंचं भाषण थांबवलं. तेवढ्यात अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हटलं, "मला येऊन भेट...". अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.

Ajit Pawar Prajakt Tanpure
Lok Sabha Election 2024 : मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी अन् भाजपचा दावा, श्रीरंग बारणे म्हणाले...

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "दिवसा वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यासाठी महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही प्रयत्न केले. पण, आता प्रत्येक अधिवेशनात ओरडून ओरडून सांगत आहे. पुढं काहीही होत नाही. आता दादांनी सांगितलं मला येऊन भेट... म्हणजे निधी मागण्यासाठी दादांना भेटत असतो."

Ajit Pawar Prajakt Tanpure
Dilip Mohite Patil: आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा अन् दिलीप मोहितेंची उघड नाराजी; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com