विशेष

BJP Politics : भाजपचे आमदार जीवाच्या आकांताने पक्षात हवा भरतायत... शिंदे-अजितदादा हळूच टाचणी लावतायत

Maharashtra political BJP internal politics news : पहिल्या टप्प्यातील तीन माजी नगरसवेकांचा भाजप प्रवेश नुकताच पार पडला. पण पालिकेच्या सत्ताकारणासाठी एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना खेचण्याची स्पर्धाच जणू महायुतीमध्ये लागली आहे

सरकारनामा ब्युरो

सचिन शिंदे

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आणि कराड नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आमदार डॉ. अतुल भोसले सक्रिय झाले आहेत. त्यानुसार शहरातील अनेकांचा पक्षप्रवेशाची चर्चा आहे. यात पहिल्या टप्प्यातील तीन माजी नगरसवेकांचा भाजप प्रवेश नुकताच पार पडला. पण पालिकेच्या सत्ताकारणासाठी एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना खेचण्याची स्पर्धाच जणू महायुतीमध्ये लागली आहे.

भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून वेगळा पर्याय निवडला आहे; परंतु भाजपमधील ही गळती नजरेआड झाल्‍याची चर्चा मात्र मोठी आहे. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व हिंदू एकता संघटनेचे सक्रिय पदाधिकारी रूपेश मुळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्‍वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

मागील काही दिवसांत भाजप कार्यकारिणीचे माजी सचिव राजेंद्र खोत, वैभव आवटे, श्रीमती हरदास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्‍ये (अजित पवार) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपमध्येही पक्ष बदलाचे वारे वाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचे गंभीर परिणाम होण्याचेही संकेत आहेत.

तीन माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे शहरात जोरदार चर्चा झाली. त्यात शिंदे गटाच्या स्‍मिता हुलवान, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, माजी नगरसवेक इंद्रजित गुजर व सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रवेशासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी लक्ष घातले होते.

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. पण एका बाजूला ताकद वाढत असतानाच घटणारी ताकदही भाजपसाठी चिंतेची बाब बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT