
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीतील वाटाघाटी निष्फळ ठरल्यास दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव केला आहे.
आमदार शेखर निकम यांनी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो सर्वांनी मान्य करण्याचे स्पष्ट केले आहे.
उदय सामंत यांच्या टीकेनंतर शेखर निकम यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Ratnagiri News : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या स्वबळाच्या वक्तव्यावरून येथे वाद उफाळला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार तिखट टीका केली. तसेच खरीखोटी सुनावत हिंमत असेल तर एकदा जाहीर कराच. मग आम्हीही शिवसेनेचा बाण कसा चालतो ते दाखवतो आणि आम्ही ते दाखवलंही असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला होता.
या वादाच्या दरम्यान सामंत यांच्या इशारा वजा धमकीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील जशास तसे उत्तर देताना स्थानिक नेत्यांचे मनावर घ्यायचं नसतं. महायुती म्हणूनच निवडणूका लढल्या जातील असे स्पष्टीकरण दिले होते. तर सामंत यांनी देखील आम्ही देखील महायुती म्हणून लढण्यावर ठाम असल्याचे म्हणत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले होते.
या दरम्यान आता शेखर निकम यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे, असा ठाम निर्धार करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला देत झापले आहे. या बैठकीत, महायुतीमधील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तर दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. मात्र यावर शेखर निकम यांनी बचावात्मक पवित्रा घेत याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठी घेतील. ते जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा लागेल.
तर महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्वस्तरांवर विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवत दम काढावा.
महायुतीबाबत वरून सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
रिंगणात उमेदवार उतरवण्यास सज्ज
चिपळूण विधानसभा मतदारसंघात 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गण आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उतरवू शकतात, असा निर्णय आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. मित्रपक्षांमधील महायुतीबाबत चर्चा सुरू असली तरीही आपली तयारी करूया असे निकम यांनी सांगितले.
1. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय मागणी केली आहे?
→ वाटाघाटी निष्फळ ठरल्यास स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
2. शेखर निकम यांनी याबाबत काय म्हटलं आहे?
→ वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो सर्वांनी मान्य करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
3. उदय सामंत यांनी कोणती टीका केली होती?
→ उदय सामंत यांनी राष्ट्रवादीवर स्वबळाच्या घोषणेबद्दल अप्रत्यक्ष टीका केली होती.
4. शेखर निकम यांनी भूमिका बदलली का?
→ सामंत यांच्या टीकेनंतर निकम यांनी भूमिका मवाळ केली असल्याची चर्चा आहे.
5. महायुतीतील युतीबाबत सध्या काय स्थिती आहे?
→ महायुतीत जागा वाटप आणि स्थानिक युतीबाबतचे निर्णय अद्याप प्रलंबित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.