Narendra Modi, Sharad Pawar, Rahul Gandhi Sarkarnama
विशेष

BJP Vs Sharad Pawar : 'A फॉर अमेठी, B फॉर बारामती'चं काय झालं? तेलही गेलं, तूपही गेलं, भाजपच्या हाती...

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपला आकाश ठेंगणं झालं होतं. केंद्रात मोठं संख्याबळ आहे तसेच राज्यातही आणू, अशा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये ठासून भरला गेला. उत्तर प्रदेशातील अमेठीत सलग दोन वेळा काँग्रेसला हद्दपार केल्यानंतर भाजपला बारामतीतून सुप्रिया सुळेंना पराभूत करून ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राजकारण संपुष्टात आणण्याचे स्वप्न पडू लागले. पवारांची बारामती खालसा करण्याच्या नादात मात्र भाजप अमेठीही गमावून बसले आहे.

अमेठीतून लोकसभेच्या 2014 आणि 2019 निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधींना Rahul Gandhi भाजपने पराभूत केले. त्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीवर तिरपी नजर पडली होती. यातूनच A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती असे म्हणत भाजपकडून वारंवार शरद पवारांना चॅलेंज दिले जात होते.

आता 2014 च्या निवडणुकीत अजितदादांच्या माध्यमातून शरद पवारांपुढे मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपने केले होते. भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी तर शरद पवारांचे Sharad Pawar राजकारण संपवणे हेच आमचे ध्येय असल्याचे विधान केले होते. त्यानुसार येथील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंतील फाईट टफ झाली. मात्र शरद पवारांच्या रणनीती कामाला आली आणि सुप्रिया सुळेंचा तब्बल 1 लाख 58 हजार 333 मतांनी निवडून आल्या.

एकीकडे बारामती काही भाजपच्या हाती लागली नाही. दुसरीकडे मात्र हातात असलेली अमेठीही भाजपला गमवावी लागली. अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल भाजपच्या मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करून जायंट किलर ठरले आहेत. किशोरी लाल यांना 5 लाख 39 हजार 228 मते मिळाली, तर स्मृती इराणींना 3 लाख 72 हजार 32 मतांवर समाधान मानावे लागले. लाल यांनी भाजपच्या मंत्री इराणींचा तब्बल 1 लाख 67 हजार 196 मतांनी पराभव केला.

राज्यातील भाजपच्या नेत्यांना वारंवार 'ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती' असे सांगून 2024 मध्ये बारामती हा पवारांचा गड खालसा करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र बारामतीचा आपला बालेकिल्ला राखण्यात पवारांना यश मिळाले तर दुसरीकडे भाजपकडून अमेठीही काँग्रेसने पुन्हा जिंकली. त्यामुळे तेलही गेले, तूपही गेले भाजपच्या हाती धुपाटणेच राहिले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT