Ramtek's Defeat Effect : रामटेकचा पराभव भाजपच्या जिव्हारी; एका आमदाराचे तिकिट कापणार, दुसऱ्याची मंत्रिपदाची संधी हुकणार!

Lok Sabha Election 2024 : गेल्या निवडणुकीत सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमानेंना आघाडी होती. या वेळी कॉंग्रेसचे श्याम बर्वें यांनी सर्वच मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
MLA Raju Parve
MLA Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 07 June : रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचे खापर एखाद्या आमदारावर फोडून त्याचे विधानसभेचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. विशेषतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांचा नंबर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महायुतीमध्ये रामटेक हा मतदारसंघ (Ramtek Loksabha Constituency) शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र, भाजपच्या दबावाने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकिट कापून ऐनवेळी काँग्रेसमधून आयात केलेले आमदार राजू पारवे (MLA Raju Parve) यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवले. मात्र, नवख्या श्यामकुमार बर्वे (Shyam Kumar Barve) यांच्याकडून पारवे यांचा पराभव झाला. ताकद असूनही रामटेक हातचा गेल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामटेकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीच्या एकदम उलटा निकाल यावेळी लागला आहे. गेल्या निवडणुकीत सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमानेंना आघाडी होती. या वेळी कॉंग्रेसचे श्याम बर्वें यांनी सर्वच मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपचे दोन आणि शिंदेसेनेचा एका आमदार जिल्ह्यात आहे. त्यापैकी एकाही आमदाराला पारवे यांना वाचवता आलेले नाही.

रामटेक लोकसभेचा निकाल अनेकांना धक्का देणारा ठरू शकतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातूनही महायुती पिछाडीवर आहे. तब्बल १७ हजार ५०० मते या वेळी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आहेत. विशेष म्हणजे बावनकुळे कामठीतून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

MLA Raju Parve
Mohite Patil-Jankar Yuti : माळशिरसमधील घटलेल्या लीडने मोहिते पाटील-जानकर युतीचे वाढविले टेन्शन...

बावनकुळे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री होते. ते सध्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे कामठीतून महायुतीला सर्वाधिक आघाडीची अपेक्षा होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील कामठी तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही झाली होती.

भाजपचे आमदार असलेल्या समीर मेघे यांच्या हिंगणा मतदारसंघातूनही मोठे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. मात्र येथेही महायुती पिछाडीवर राहिली आहे. मेघे येथून दोनदा जिंकून आले आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. संभाव्य मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे असतानाही रामटेकच्या पराभवाने त्यांच्यावरही वरिष्ठांची खप्पा मर्जी होऊ शकते, त्यातून त्यांच्यापासून मंत्रिपदाची संधी दुरावू शकते.

MLA Raju Parve
PM Narendra Modi : मोदींना झाली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; ‘एनडीए’चे तोंडभरून कौतुक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com