Lok Sabha Election 2024 Analysis : महाराष्ट्रात तोळा मासाच्या काँग्रेसला आले बारा हत्तीचे बळ !

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi News : भाजपने निवडणुकीपूर्वीच 'अबकी बार चारसो पार'ची घोषणा केली असली तरी बहुमतापर्यंत पोचतानाच त्यांना पुरत टेन्शन आले होते. भाजप सरकारला मित्र पक्षांच्या कुबडयावर अवलंबून राहावे लागणार आहे.
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवत सत्तेचा सोपान राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आले असले तरी भाजपचा स्वबळावर सत्ता मिळवण्याचा मार्ग काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने बिकट केला. त्याचमुळे येत्या काळात भाजप सरकारला मित्र पक्षांच्या कुबडयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भाजपने निवडणुकीपूर्वीच 'अबकी बार चारसो पार'ची घोषणा केली असली तरी बहुमतापर्यंत पोचतानाच त्यांना पुरत टेन्शन आले होते. गेल्या दहा वर्षातील भाजपची (Bjp) कामगिरी पाहता पहिल्यादांच लोकसभा निवडणुकीत चक्क बहुमतासाठी झगडावे लागत असल्याचे दिसले.

काँग्रेसच्या झंझावती प्रचारामुळे गेल्या तीन निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप नेत्यांना ऐन निवडणुकीतच प्रचाराची स्टॅटर्जी बदलावी लागली. निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावलेल्या भाजपला महाराष्ट्रात पीएम मोदींच्या तब्बल 19 सभा घ्याव्या लागल्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला भाजपला 240 च्या आसपास जागा मिळाल्या तर मित्रपक्षांच्या मदतीनं बहुमताचा 272 चा आकडा गाठता आला.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम देशात सात टप्पे, 43 दिवस रंगला. भाजप व काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. भाजपकडून पीएम नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक 206 रॅली आणि रोड शो केले तर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) 107 रॅलीत रोड शोच्या आणि सभातून आपला मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.

पीएम मोदींनी (Narendra Modi) प्रत्येक प्रचारात विविध मुद्दे उपस्थित करत विरोधकांना हैराण केले. पीएम मोदींनी सभांतून विरोधक सनातन संपवतील, मंगळसूत्राचा मुद्दा, काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल, इंडिया आघाडी जिंकल्यास प्रत्येक वर्षी पंतप्रधान बदलेल, ते हिंदूंना भगीरथी नदीत उतरवतील, असे मुद्दे मांडत विरोधकांना आपल्या पीचवर खेळवले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापासून त्यांनी कठोर वक्तव्य करण्यास सुरुवात केली. महिलाचे मंगळसूत्र ते मुस्लिम समाजाला धर्मांच्या आधारावर आरक्षण देतील, हे वक्तव्य करीत विरोधकांना फसवण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे राहुल गांधी यांनी 107 रॅलीत रोड शोच्या आणि सभातून आपला मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उत्तर प्रदेशात 17, कर्नाटक, तेलंगणा, दिल्लीमध्ये प्रत्येकी सहा तर मध्यप्रदेशमध्ये पाच, केरळमध्ये 14, महाराष्ट्र 13, पंजाब, राजस्थान, ओडिसा, गुजरात प्रत्येकी तीन तर हरियाणामध्ये चार व हिमाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन सभा घेतल्या.

राहुल गांधींनी या सभांतून बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला आठ हजार पाचशे रुपये देणार, आरक्षण मर्यादा 50 टक्क्यावर नेणार, महिलांना प्रत्येक वर्षी एक लाख रुपये देणार, महिलांचे आरक्षण तात्काळ लागू करणार, शेतकऱ्यांना मदत करणार, लोकशाही आणि संविधान वाचवून, आरक्षणावरून राहुल गांधींनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी पाच न्याय गॅरंटीवर लक्ष केंद्रित केले होते. या मुद्दयावरच राहुल गांधींनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Nitesh Rane : संविधानासाठी लढले की शरिया लागू करण्यासाठी...? नितेश राणेंची ठाकरे गटावर सडकून टीका

दुसऱ्या टप्प्यापासून काँग्रेसने (Congress) प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र जाणवत होते. विशेषतः दोन्ही बाजूने विकासात्मक मुद्दे न मांडता एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानल्याने यावेळेस प्रचारात विकासात्मक मुद्दे गायब दिसले. पीएम मोदींनी दहा वर्षांत केलेली विकास कामे सांगून पुढील पाच वर्षांत काय करणार ? यावर भर दिला असता तरी मतदारांना आवडले असते. मात्र, त्यांच्याबाबत मतदारांत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे या निवडणुकीत यांचा मोठा फटका भाजपला बसला आहे. दुसरीकडे काँग्रेसला याचा फायदा झाला असला तरी बहुमतापर्यंत पोचता आले नाही.

महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या तर महायुतीच्या वाट्याला 17 तर अपक्षाला एक जागा मिळाली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जवळपास 17 जागा लढल्या होत्या तर 13 जागी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वात कमी म्हणजे 10 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 8 जागा जिंकल्या. शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढल्या तर त्यापैकी 9 जागा जिंकल्या.

या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने तब्बल 28 जागा भाजपने लढल्या होत्या, त्यापैकी केवळ 9 जागी विजय मिळवता आला. शिवसेना शिंदे गटाने 15 जागा लढल्या त्यापैकी 7 जागा जिंकल्या. सर्वात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 जागा लढल्या होत्या. त्यामधील एक जागा जिंकली.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Jaykumar Gore : गोरेंचा अतिआत्मविश्वास भाजपला नडला; 'या' चुकीमुळे माढ्यासह सोलापूर गमावला....

या निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइक रेट खूप कमी दिसला तर उलट महाविकास आघाडीचा स्ट्राइक रेट वाढलेला दिसला. त्यामुळे या निवडणुकीत मूळ पक्षांच्या पाठीशी मतदार असल्याचे चित्र निकालानंतर दिसते. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आम्ही असली, तुम्ही नकली असा दावा दोन्ही गटाकडून केला जात होता.

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर फुटून बाहेर पडलेल्या पक्षाच्या पाठीशी जनता नसल्याचे दिसत आहे. त्यासोबाबतच उद्धव ठाकरे व शरद पवार गटासोबत असलेल्या सहनभुतीचा फायदा या दोन्ही पक्षासोबत काँग्रेसला देखील झाला.

2022 नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाकडे 5 खासदार होते तर शरद पवार गटासोबत तीन खासदार होते. तर काँग्रेससोबत एक खासदार होता. या निवडणुकीनंतर सर्वाधिक फायदा काँग्रेसचा झाला असून त्यांचा पक्ष एकवरून 13 वर गेला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे 5 खासदार होते त्यांचे वाढून 9 झाले तर तर शरद पवार गटासोबत तीन खासदार होते त्यांचे वाढून आता आठ झाले आहेत.

Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi
Kishore Gajbhiye : बंडखोरी फसली, किशोर गजभियेंचे डिपाॅझिट जप्त

या निवडणुकीत काँग्रेस सेकंड क्लासमध्ये येणार नाही, असे भाजपवाले ठासून सांगत होते. मात्र, काँग्रेसने राज्यात दमदार कामगिरी करीत 13 जागेपर्यंत मजल मारली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यसह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे एकही खासदार सोबत नाही की आमदाराची संख्या देखील कमी राहिली त्याचा फटका सहन करावा लागला. सातत्याने पक्ष सोडून जाणाऱ्या मंडळींमुळे काँग्रेसची प्रतिमा काळवंडली होती. मात्र, या निवडणुकीत सर्वच नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्याने मोठे यश मिळाले.

काँग्रेसला यश मिळण्यासाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, गोवाल पाडवी, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर यांनी कष्ट घेतले. त्याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला आहे. येत्या काळात काँग्रेस सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाने महाराष्ट्रात तोळा मास्याच्या काँग्रेसला आता बारा हत्तीचे बळ आले आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com