Shreejaya Chavan, Sambhaji Nilngekar, Ranajagjitsinh Patil, Atul Save, Sidharth shirole, Nitesh Rane Sarkarnama
विशेष

BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीवर घराणेशाहीचे वर्चस्व; वीस उमेदवार राजकीय कुटुंबातून

Assembly Election 2024 : आगामी काळात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीत होणारी ही विधानसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील या घराणेशाहीच्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने आता सर्वांचे लक्ष आगामी काळात होत असलेल्या लढतीकडे लागले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी भाजपने पहिल्या यादीतच काही राजकीय कुटुंबातील नेते मंडळींच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे आगामी काळात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीत होणारी ही विधानसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील या घराणेशाहीच्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी 2014 व 2019 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्या नातलगमंडळीना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

भाजपमधील नेतेमंडळी मैदानात उतरणार असल्याने या रंगतदार लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. माजी मुख्यमंत्र्यांचे तीन नातलग तर माजी मंत्री, खासदार व आमदार यांचे नातेवाईक रिंगणात उतरणार आहेत.

भाजपने जाहीर केलेल्या या 99 जणाच्या पहिल्या यादीत राजकीय कुटुंबातील 20 जणांना संधी देण्यात आली आहे. भाजपने या माध्यमातून घराणेशाहीचा वारसा जपला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी दिली आहे.

त्यानंतर जिंतूरमधून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर, केजमधून माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सूनबाई नमिता मुंदडा या नातलगांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील भोकरदन मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव अतुल सावे, तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री पदमसिंह पाटील यांचे सुपुत्र राणाजगजीतसिंह पाटील, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर, मुखेडमधील माजी आमदार राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना उमेदवारी दिली आहे.

श्रीगोंदामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कन्या प्रतिभा पाचपुते, शेवगावमधून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे, कल्याण पूर्व मतदारसंघातून माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना रिंगणात उतरविले आहे.

विदर्भातील खामगावमधून माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर, हिंगणामधून दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे, चंदवाड मतदारसंघातून माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र राहुल आहेर तर मालाडमधून माजी मंत्री आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना संधी देण्यात आली तर कणकवलीतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांना संधी दिली आहे.

दौडमधून माजी आमदार सुभाष कुल व रंजना कुल यांचे चिरंजीव राहुल कुल यांना संधी दिली तर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे तर इचलकरंजीमधून माजी आमदार प्रकाश आवडे यांचे चिरंजीव राहुल आवडे तर कोल्हापूर मतदारसंघातून खासदार धनंजय महाडिक यांचे पुतणे अमल महाडिक यांना रिंगणात उतरविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT