Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांतील घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटच मोठा भाऊ ठरला आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून मुंबईतील जागावाटपात शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानसभेच्या 36 जागापैकी सर्वाधिक 22 जागा उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. तर उर्वरित 12 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. एक जागा समाजवादी पक्ष तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार गटाच्या वाट्याला आली आहे.
आघाडीचा मुंबईसाठीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुंबईत सध्या उद्धव ठाकरे गटाकडे 15 पैकी आठ आमदार आहेत. त्यात आदित्य ठाकरे वरळी, अजय चौधरी शिवडी, ऋतुजा लटके अंधेरी पूर्व, रमेश कोरगावकर भांडुप, सुनील राऊत दिंडोशी, प्रकाश फरतेपुरकर चेंबूर यांचा समावेश आहे.
मुंबईमधील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल मुंबादेवी, वर्षा गायकवाड धारावी, झिशान सिद्धकी बांद्रा पूर्व आणि असलम शेख मालाड यांचा समावेश आहे. वर्षा गायकवाड लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. तर झिशान सिद्धकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.
जागा वाटपामध्ये चांदवली मतदारसंघ अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बांद्रा पूर्व मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढविण्याची शक्यता आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तर काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला सोडणार असल्याचे समजते.
दुसरीकडे विधानसभेच्या मुंबईतील 36 जागापैकी सर्वाधिक 22 जागा उद्धव ठाकरे गट लढणार आहे तर 12 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. एक जागा समाजवादी पक्ष तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.