BJP Meeting Sarkarnama
विशेष

Dispute in Kalyan BJP-Shivsena : युतीत खडाखडी कायम, ‘त्या’ PIवर भाजपचे गंभीर आरोप; सीबीआय, ईडीकडे तक्रार करणार

सरकारनामा ब्यूरो

Kalyan Shivsena-bjp News : शिवसेना-भाजप युतीमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्यावरून तणाव निर्माण झाला आहे, ते मानपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे. (BJP's serious allegations against Manpada police inspector Shekhar Bagde; Will report to CBI, ED)

मानपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे हे शिवसेनेच्या (Shivsena) जवळीचे मानले जातात. त्यांच्यावरून सध्या कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. जोपर्यंत बागडे यांची बदली होत नाही; तोपर्यंत आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भाजपला प्रत्युत्तर देत आम्ही नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी परिश्रम घेत आहेत. पण, भाजपच्या स्थानिक नेत्यांची वेगळी भूमिका असेल तर मी आताच खासदारपदाचा राजीनामा देतो, तुम्हाला ज्यांना कोणाला तिकिट द्यायचे त्याला द्या. त्याच्या विजयासाठी आम्ही काम करू, अशा शब्दांत आव्हान दिले होते. त्यानंतरही भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मानपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. बागडे यांची सक्तवसुली संचनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाडे तक्रार करण्यात येणार आहे. बागडे शिवसेनेच्या जवळचे आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्याने म्हटलेले आहे.

शेखर बागडे यांनी डोंबिवली, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांशी घातलेला वाद आणि नागरिकांवर केलेला अन्याय याच्याविरोधात आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही लढा देत आहोत. अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी आमच्याकडे बागडे यांच्या विरेाधत तक्रारी केल्या. या सर्व प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून तपासणी होऊन शेखर बागडे याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT