Chandrakant Patil -Narendra Modi
Chandrakant Patil -Narendra Modi Sarkarnama
विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न मराठमोळ्या चंद्रकांत पाटलांनी पूर्ण केले!

सरकारनामा ब्यूरो

गांधीनगर : भारतीय जनता पक्ष (BJP) गुजरातमध्ये (Gujrat) आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश मिळविले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीत दीडशेहून अधिक जागा जिंकून विक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदींची ही इच्छा गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ऊर्फ सी. आर. पाटील (Chandrakant Patil) यांनी पूर्ण करत तब्बल १५६ जागा जिंकल्या आहेत. पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील खानदेशचे आहेत. (Chandrakant Patil fulfilled Narendra Modi's dream!)

सी. आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे नेते मानले जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ते पक्षात नवनवीन प्रयोग करत राहतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे 2015 मध्ये त्यांच्या कार्यालयाला चांगले व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी ISO 2009 प्रमाणपत्र मिळाले आहे.

सी. आर. पाटील यांनी 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर नवसारी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. पुढे 2014 मध्ये त्यांनी पुन्हा तीच जागा मोठ्या फरकाने जिंकली. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते नवसारी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झाले आणि सर्वाधिक मतांनी विजयी होणारे देशातील तिसरे खासदार ठरले. पाटील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचे समन्वयकही होते. सीआर पाटील हे दक्षिण गुजरातमधील भाजपचा लोकप्रिय चेहरा आहेत.

या वर्षी जुलैमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातमधील दिग्गज नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मोदींनी पक्षाला यावेळी राज्यात 150 हून अधिक जागा जिंकण्याचे टार्गेट दिल्याचे सांगण्यात येते. गुजरात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सी. आर. पाटील यांच्याकडे होती. त्यांनी हे सर्वात मोठे ध्येय बनवले. मोदींचे स्वप्न प्रत्येक स्तरावर पूर्ण होईल, असे सी. आर. पाटील यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते. ते आज पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

सी. आर. पाटील हे संघटनेतील वेगवान खेळाडू आहेत. संघटना विस्तार आणि ऑपरेशनमध्ये ते पारंगत मानले जातात. जनतेची नाराजी कशी दूर करायची आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे कसे जायचे, ही कला पाटील यांनी चांगलीच आत्मसात केली आहे. पाटील यांचा सर्वसामान्यांशी थेट संबंध आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सी.आर. पाटील यांनी ते आपले प्रमुख अस्त्र बनवले. जनतेच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात सहभागी होत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही तशा सूचना केल्या. त्यामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने लोकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. तेही भाजप कोणाला आवडले नाही.

गेल्या निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये मोठे पाटीदार आरक्षण आंदोलन झाले होते. पाटीदार नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांसारखे युवा नेते त्यात नेतृत्व करत होते. नंतर या तरुण नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांनी या नेत्यांना काँग्रेसपासून तोडले. दोन्ही युवा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय 2017 मध्ये भाजपचा पराभव झालेल्या अनेक जागांच्या आमदारांचाही पक्षात समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात भाजप कार्यालयात पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यात आली. सी. आर. पाटील यांनी आपला नंबरही जाहीर केला होता आणि ज्यांना कोणतीही अडचण येत असेल त्यांनी थेट माझ्याशी बोला, असे सांगितले होते. पाटील यांच्या या कार्यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले.

सी.आर. पाटील यांना नाविन्य कसे आणायचे हे माहित आहे. जनतेला जोडण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबल्या जातात. त्यामुळेच आजही पाटील यांच्या सांगण्यावरून पक्षाकडून लाखो लोकांचे फोनवर मेसेज येतात. या निवडणुकीत प्रचारातही रोबोटचा वापर करण्यात आला. पाटील हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT