Chhagan Bhujbal-Tanaji Sawant Sarkarnama
विशेष

Chhagan Bhujbal : सावंतांच्या 'त्या' विधानावर भुजबळांची मिश्किली; ‘नाही हो, मी तर परफ्यूम, सेंट मारून जातो...’

Vijaykumar Dudhale

Mumbai, 06 September : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मळमळण्याबाबत केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. नाही हो, मंत्रिमंडळ बैठकीला मी तर परफ्यूम, सेंट लावून जातो. तरीही मळमळल्यासारखं होत असेल तर गोळीसुद्धा असते. ती मुख्यमंत्र्यांनी सावंतांना दिली असेल, असा टोलाही भुजबळ यांनी सावंतांना लगावला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो; परंतु बाहेर आल्यावर आम्हाला मळमळल्यासारखे होते, असे विधान शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.

तानाजी सावंत यांच्या विधानावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रश्न संपण्याच्या अगोदरच, ‘नाही हो..., कशी काय उलटी होईल, मी तर सर्व अंगावर परफ्युम आणि सेंट मारून जातो एकदम...खरं सांगतो. त्यानंतरही तसं होत असेल तर त्यावर गोळीसुद्धा असते.

मी लहान होतो, त्यावेळी प्रवासात मळमळल्यासारखं व्हायचं. पण, ती गोळी खाल्ली काही व्हायचं नाही, मला नाही वाटत तसं काही असेल. मी तर पाहिलं नाही तसं काही... असेही भुजबळ म्हणाले.

तानाजी सावंत यांना तुम्ही ती गोळी दिली आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावरही भुजबळ यांनी अनुभव कामी लावत समर्पक उत्तर दिले. ‘तानाजी सावंत यांना ती गोळी मुख्यमंत्र्यांनी दिली असेल,’ असा टोला भुजबळ यांनी लगावला.

दरम्यान, एखादा नेता विधानसभा निवडणुकीची तयारी करत असेल आणि त्या ठिकाणी अजितदादांचा आमदार असेल, तर त्या नेत्याची विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी जाते. अशा वेळी तो नेता काहीतरी आरोप करत पक्ष सोडून दुसरीकडे जात असतो, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत हे पक्षांतराचे वारे आणखी जोराने वाहू शकते, अशी शक्यताही छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT