Akola, 06 September : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरसंधान करणाऱ्या शिंदे गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
लाडकी बहिण योजनेच्या फोटोवर बोलणाऱ्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या विधानावर का बोलले नाहीत. आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असेल, तर आम्हीही शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) क्रेडिटवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. या योजनचे क्रेडिट एकटे अजितदादा कसे घेऊ शकतात, असा हल्लाबोल देसाई यांनी केला होता. त्याला अजित पवारांच्या मंत्र्यांनीही उत्तर दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला होता. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणारे शंभूराज देसाई यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील फोटोवर बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावेळी भूमिका का मांडली नाही?
लाडकी बहीण योजनेच्या फोटोवरून काही चुकीचं झालं असेल तर त्यात दुरुस्ती करता येईल, मात्र या मुद्द्यावरून महायुतीत भांडण लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा टोला यावेळी मिटकरींनी लगावला.
महायुतीमधील कोणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जसा आदर आहे, तसा आम्हालाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदर आहे, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावेळी आपली भूमिका का मांडली नाही. अनाथांचा नाथ एकनाथ... असे बॅनर झळकले, त्यावेळी आम्ही त्याचं स्वागत केलं, अशी आठवणही मिटकरींनी देसाईंना करून दिली.
आपल्या वक्तव्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिणाम होईल, अशी अपेक्षा शंभूराज देसाई यांच्याकडून नव्हती. आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असेल, तर आम्हीही शांत बसणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.
रुपाली ठोंबरेंना सल्ला
रूपाली चाकणकर यांच्या आमदारकीच्या नावाला रूपाली ठोंबरे पाटील यांनी विरोधाची भूमिका घेतली. या मुद्द्यांवर पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केली जावी. पक्षातील कुणीही सामाजिक माध्यमांच्या व्यासपीठावर पक्षांतर्गत प्रश्नांची चर्चा करू नये, त्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळतं आणि पक्ष बॅकफुटवर जातो, असा सल्लाही त्यांनी रूपाली ठोंबरे पाटील यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.