Legislative Council Election Results : राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये तीन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चमकदार कामगिरी करत तीन जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपने कोणकची एक जागा जिंकली तसेच एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती नाशिकची येथे सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूरातच त्यांना हादरा बसला. तेथे काँग्रेसचे (Congress) सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय मिळवला. तर अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा परवाभव करत धीरज लिंगाडे यांनी विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसला या विधान परिषद निवडणुकीत दोन आमदार मिळाले.
विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेसला एकच जागा होती. ती म्हणजे नाशिकची. नाशिकमध्ये काँग्रेस हमखास विजयी होणार, अशी परिस्थिती असताना तेथे वेगळेच राजकारण घडले. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसची निवडून येणारी जागा गेली. भाजपने खेळी करत सत्यजीत तांबे यांना स्थानिक पातळीवर छुपा पाठिंबा दिला.
त्यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली होती. मात्र, वेळेवर दिलेल्या उमेदवारांनी काँग्रेसला यश मिळवून दिले. नागपुरध्ये अडबाले आणि अमरावतीध्ये लिंगाडे यांनी काँग्रेसला ताकद दिली. त्यामुळे काँग्रेसचा एक उमेदवार गेला तर त्यांना दोन आमदार मिळाले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भाजपला (BJP) मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला. तर नाशिकमध्ये सत्याजीत तांबे यांनी दणदणीत विजय संपादन केला. तसेच औरंदाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विक्रम काळे विजयी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.