Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

MVA News : काँग्रेस-ठाकरे-पवारांचं ठरलं; 288 जागांची चर्चा पूर्ण, 'या' फॉर्म्युल्यानुसार होणार जागावाटप

Politcal News : राज्यातील 288 मतदारसंघावर चर्चा पुर्ण झाली असून 240 ते 245 जागांवर तीन पक्षात एकमत झाले आहे तर केवळ 30 ते 35 जागांवर अद्याप तीन पक्षात तिढा आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने गेल्या तीन दिवसापासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु होती. राज्यातील विभागानुसार गेल्या तीन दिवसांत चर्चा झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. राज्यातील 288 मतदारसंघावर चर्चा पुर्ण झाली असून 240 ते 245 जागांवर तीन पक्षात एकमत झाले आहे तर केवळ 30 ते 35 जागांवर अद्याप तीन पक्षात तिढा आहे.

तीन दिवस झालेल्या चर्चेनंतर राज्यातील 288 जागांची चर्चा पूर्ण झाली आहे. 30 ते 35 जागांवर तिढा असून या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार आहे. यामध्ये तीन पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर हा तिढा सुटणार आहे. त्यामुळे काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आघाडीतील तीन पक्षाचे एकत्रित लवकरच मेळावे घेतले जाणार आहेत. (MVA News)

राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 100 जागा काँग्रेस (Congress), 100 जागा शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट तर 84 जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट लढणार आहे तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. 2019 साली जिंकलेल्या काही जागांवर महाविकास आघाडीचे ठरले आहे. विभागानुसार मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील सर्व जागांवर चर्चा पूर्ण झाली आहे.

जवळपास 220 ते 230 जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सहमती झाली आहे. महाविकास आघाडीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. राज्यातील 30 ते 35 जागावर तिढा असून या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास जागा त्याच पक्षाला जागा वाटपात दिला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. जिंकलेल्या जागांमध्ये दहा ते वीस टक्के बदल केला जाणार असल्याचे समजते.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा पहिल्या बैठकीत झाली. मुंबई-कोकण आणि त्यानंतर मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पार पडली.

तिढा असलेल्या जागांवर करणार सर्व्हे

तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय शेवटच्या टप्प्यात घेतला जाणार आहे. विदर्भातील विधानसभा जागांवर पुढील बैठकीत चर्चा होऊन त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, लवकरात लवकर जागा वाटपावर निर्णय घेण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT