Delhi Blast .jpg Sarkarnama
विशेष

Delhi Blast: 1997 पासून ते 2025पर्यंत राजधानी दिल्लीत कुठे, कधी अन् एकूण कितीवेळा बॉम्बस्फोट झालेत? हादरवणारी हिस्ट्री वाचाच...

Delhi Car Blast 2025: देशाची राजधानी दिल्ली पहिल्यांदाच नव्हे तर गेल्या काही वर्षांत अनेकदा दहशतवादी संघटनांकडून बॉम्ब स्फोटासाठी टार्गेट ठरली आहे. यापूर्वीही दिल्लीनं असे अनेक बॉम्ब स्फोटाचे हादरे सहन केले आहेत.

Deepak Kulkarni

New Delhi News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी(ता.10) संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन सिग्नलजवळ हा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि त्यात आजूबाजूच्या काही गाड्या जळून खाक झाल्या. या भीषण स्फोटानं सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहे. या स्फोटाकडे दहशतवादी संघटनांच्या घातपाताचा संशय म्हणूनही पाहिले जात आहे.

दिल्लीतील या स्फोटामागे (Delhi Car Blast) दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु आहे. कार स्फोटानंतर अवघ्या काही तासांतच दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम, एनआयए आणि क्राईम ब्रांचची पथके घटनास्थळी दाखल झाली. स्फोटासाठी नेमके काय वापरले गेले, हे शोधण्यासाठी अवशेष गोळा केले जात आहेत.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुप्तचर विभागाच्या (IB) प्रमुखांसोबत या घटनेबाबत चर्चा करत तपासाबाबत महत्त्वाच्या सूचनाही केल्या. या स्फोटानंतर दिल्लीच्या अनेक भागांमध्ये विशेष पथकांनी छापे टाकले असून, दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

देशाची राजधानी दिल्ली पहिल्यांदाच नव्हे तर गेल्या काही वर्षांत अनेकदा दहशतवादी(Terriost) संघटनांकडून बॉम्ब स्फोटासाठी टार्गेट ठरली आहे. यापूर्वीही दिल्लीनं असे अनेक बॉम्ब स्फोटाचे हादरे सहन केले आहेत. 1997 मध्ये ITO येथील दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर झालेला स्फोट ते सोमवारचा स्फोट असे एकूण छोटे मोठे 15 स्फोट दिल्लीनं आजपर्यंत सहन केले आहे.

दिल्लीत जून 2000 मध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात 2 जण ठार झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते. तसच मे 2011 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाबाहेरील कार पार्किंगमध्ये छोटा स्फोट झाला होता. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. 2006 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी म्हणजे 14 एप्रिलला जुनी दिल्लीतील जामा मशिदीच्या प्रांगणात दोन स्फोट घडवून आणले होते.

9 जानेवारी 1997: ITO येथील दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर स्फोट; 50 जखमी

1 ऑक्टोबर 1997: सदर बाजार परिसरात मिरवणुकीजवळ दोन स्फोट; 30 जखमी.

10 ऑक्टोबर 1997: शांतिवन, कौरीया पूल आणि किंग्सवे कॅम्प परिसरात तीन स्फोट; 1 ठार, 16 जखमी.

18 ऑक्टोबर 1997: राणी बाग मार्केटमध्ये दोन स्फोट; 1 ठार, 23 जखमी.

26 ऑक्टोबर 1997: करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट; 1 ठार, 34 जखमी.

30 नोव्हेंबर 1997: लाल किल्ला परिसरात दोन स्फोट; 3 ठार, 70 जखमी.

26 जुलै 1998: कश्मीरी गेट ISBT येथे बसमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट; 2 ठार, 3 जखमी.

18 जून 2000: लाल किल्ल्याजवळ दोन शक्तिशाली स्फोट; 8 वर्षांची मुलगीसह 2 ठार, सुमारे 12 जखमी.

22 मे 2005: दोन चित्रपटगृहांमध्ये स्फोट; 1 ठार, 60 जखमी.

29 ऑक्टोबर 2005: सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी बसमध्ये तीन स्फोट; 59 ठार, 100 हून अधिक जखमी (परदेशी नागरिकांसह).

14 एप्रिल 2006: जुनी दिल्लीतील जामा मशिदीच्या प्रांगणात दोन स्फोट; किमान 14 जण जखमी.

13 सप्टेंबर 2008: कनॉट प्लेस, करोल बागमधील घफ्फार मार्केट आणि ग्रेटर कैलाश-I मधील M-ब्लॉक मार्केटमध्ये 45 मिनिटांत 5 स्फोट; किमान 25 ठार, 100 हून अधिक जखमी.

27 सप्टेंबर 2008: महरौली फुलबाजारात कमी तीव्रतेच्या स्फोटात 3 जण ठार, 21 जखमी.

25 मे 2011: दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर कार पार्कमध्ये किरकोळ स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT